RBI Gold Holdings: भारताच्या आर्थिक स्थैर्याला एक नवा सुवर्णस्पर्श मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा सोन्याचा साठा आता तब्बल 95 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तसेच हा साठा लवकरच 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक स्तर मानला जात आहे.
सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ –
26 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात RBI चा सोन्याचा साठा 2.238 अब्ज डॉलर्सने वाढून 95.017 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, परकीय चलन साठ्यात घट होत असताना, सोन्याच्या साठ्यात सलग पाचव्या आठवड्यात वाढ झाली आहे.
हेही वाचा – Post Office RD Scheme: फक्त 5 वर्षांत 17 लाख रुपये परत! काय आहे पोस्ट ऑफिस आरडी योजना? जाणून घ्या
परकीय चलन साठ्यात घट
याच काळात देशाचा एकूण परकीय चलन साठा 2.334 अब्ज डॉलर्सने घटून 700.236 अब्ज डॉलर्सवर आला आहे. त्यातील फॉरेन करन्सी अॅसेट्स (FCA) 4.393 अब्ज डॉलर्सने घटून 581.757 अब्ज डॉलर्सवर आल्या आहेत. यावरून स्पष्ट होते की, RBI सध्या डॉलरपेक्षा सोन्यावर अधिक विश्वास ठेवत आहे.
हेही वाचा – RBI: RBIची कडक कारवाई; आरबीआयनं दोन फायनान्स कंपन्यांवर कारवाई करत ठोठावला मोठा दंड
जागतिक क्रमवारीत भारताची स्थिती
सध्या परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. चीन, जपान आणि स्वित्झर्लंड हे अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत, तर भारत रशियाच्या थोडा मागे आहे. मात्र सोन्याच्या साठ्याबाबत भारताचा दबदबा वाढत असून, जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा ‘गोल्ड रिझर्व्ह पॉवर’ म्हणून भारताची ओळख निर्माण होत आहे.