India Forex Reserve: भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम घोडदौड! परकीय चलन साठ्यात पाच आठवड्यांत 2.5 लाख कोटींची घसघशीत वाढ

देशाचा परकीय चलन साठा आणि सोन्याच्या साठ्यात झालेली ही ऐतिहासिक वाढ भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक आर्थिक संकटांपासून संरक्षण देणारी ठरणार आहे.

India Forex Reserve: भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम घोडदौड! परकीय चलन साठ्यात पाच आठवड्यांत 2.5 लाख कोटींची घसघशीत वाढ

India Forex Reserve: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी जाहीर केली आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 31 जुलै 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात (Forex Reserve) 10.512 अब्ज डॉलरची प्रचंड वाढ झाली असून एकूण साठा 692.866 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या सलग पाच आठवड्यांत परकीय चलन साठ्यात तब्बल 25.94 अब्ज डॉलर (सुमारे 2.5 लाख कोटी रुपये) ची घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे.  

फॉरेन करन्सी ॲसेट्स अन् सोन्याच्या साठ्यातही जोरदार उसळी
केंद्रीय बँकेच्या आकडेवारीनुसार, केवळ परकीय चलन साठाच नव्हे तर इतर घटकांमध्येही मोठी सुधारणा झाली आहे:
– परकीय चलन मालमत्ता (FCA): मुख्य घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये 8.75 अब्ज डॉलरची वाढ होऊन ती 564.68 अब्ज डॉलर झाली आहे. यामध्ये युरो, पाउंड आणि येन यांसारख्या चलन मूल्यांतील बदलांचा समावेश असतो.  
– सोन्याचा साठा (Gold Reserves): सोन्याच्या साठ्याच्या मूल्यात 1.685 अब्ज डॉलरची भर पडली असून तो 104.743 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 
– SDR व IMF राखीव स्थिती: विशेष अहवाल हक्क (SDR) 48 दशलक्ष डॉलरने वाढून 18.666 अब्ज डॉलर आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) असलेली भारताची राखीव स्थिती 28 दशलक्ष डॉलरने वाढून 4.778 अब्ज डॉलर झाली आहे.  

हेही वाचा – मोठी बातमी! EMI न भरल्यास मोबाईल लॉक? RBIने कर्जवसुलीच्या नियमांत केला मोठा बदल

FCNR(B) योजना अन् केंद्र सरकारच्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम  
यापूर्वी 27 फेब्रुवारी 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 728.494 अब्ज डॉलर या आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर पश्चिम आशियातील राजकीय तणाव आणि रुपयावरील दबावामुळे साठ्यात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र, आरबीआय आणि केंद्र सरकारने देशात परकीय चलनाचा ओघ वाढवण्यासाठी FCNR(B) (Foreign Currency Non-Resident Bank Deposits) सारख्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. या योजनांच्या माध्यमातून भारतात सुमारे 32 अब्ज डॉलरहून अधिक परकीय निधी आला असून त्याचा थेट फायदा साठा वाढण्यात झाला आहे.

मजबूत फॉरेक्स रिझर्व्हमुळे भारतीय रुपयाला मिळणार बळ  
देशाचा परकीय चलन साठा आणि सोन्याच्या साठ्यात झालेली ही ऐतिहासिक वाढ भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक आर्थिक संकटांपासून संरक्षण देणारी ठरणार आहे. मजबूत फॉरेक्स रिझर्व्हमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यास मदत होते. याशिवाय, कच्च्या तेलासह इतर आवश्यक वस्तूंचा आयात खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी हे सकारात्मक संकेत मानले जात आहेत.

हेही वाचा – Maharashtra Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकरी कर्जमुक्त; 12 लाख शेतकरी अजूनही वंचित, कारण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number