Rabindranath Tagore Jayanti 2026 : रवींद्रनाथ टागोरांची ‘ती’ अद्वितीय कविता, स्वातंत्र्याचा खरा अर्थ अन् मनाच्या सामर्थ्यांचं गुपित; जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

संगीतकार, कवी, तत्त्वज्ञ आणि कलाकार अशा विविधांगी पैलूंमुळे रविंद्रनाथ टागोर यांना कवीगुरू आणि बंगालचे कवी म्हणून गौरवले जाते.

Rabindranath Tagore Jayanti 2026 : रवींद्रनाथ टागोरांची ‘ती’ अद्वितीय कविता, स्वातंत्र्याचा खरा अर्थ अन् मनाच्या सामर्थ्यांचं गुपित; जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

Ravindranath Tagore Jayanti : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात ज्यांचे स्थान अद्वितीय आहे, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. आज 7 मे रोजी त्यांची जयंती साजरी होत आहे. संगीतकार, कवी, तत्त्वज्ञ आणि कलाकार अशा विविधांगी पैलूंमुळे त्यांना कवीगुरू आणि बंगालचे कवी म्हणून गौरवले जाते. 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांनी दिलेली नाईटहूड (सर) पदवी परत केली होती. भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांच्या राष्ट्रगीतांची निर्मिती करण्याचे असामान्य कार्य त्यांच्या हातून घडले आहे. त्यांच्या गीतांजली या अजरामर काव्यसंग्रहासाठी 1913 मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या स्वर्गाची संकल्पना
टागोरांची ‘जिथे मन निर्भय असते’ ही कविता केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित नव्हती. ब्रिटीश राजवटीच्या काळात लिहिलेली ही रचना एका अशा समाजाचे स्वप्न मांडते, की जिथे लोकांचे मस्तक अभिमानाने ताठ राहील. त्यांनी अशा राष्ट्राची कल्पना केली जिथे ज्ञान कोणत्याही बंधनाशिवाय मुक्त असेल आणि संकुचित घरगुती भिंतींमुळे जगाचे लहान तुकडे झाले नसतील. जुन्या आणि मृत रूढींच्या वाळवंटात मानवी विवेकाचा प्रवाह हरवू नये आणि प्रत्येक शब्द हा सत्याच्या गाभाऱ्यातूनच बाहेर पडावा, अशी त्यांची आग्रही धारणा होती.

कविता
जिथे मन निर्भय असते आणि मस्तक ताठ असते.
जिथे ज्ञान मुक्त असते.
जिथे जगाचे विभाजन संकुचित घरगुती भिंतींमुळे लहान लहान तुकड्यात झाले असते.
जिथे शब्द सत्याच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतात.
जिथे अथक प्रयत्न परिपूर्णतेच्या दिशेने आपले बाहू पसरतात.
जिथे विवेकाचा निर्मळ प्रवाह मृतप्राय झालेल्या जुन्या चालीरीतीच्या रखरखीत वाळवंटात हरवून जात नाही.
जिथे तुझेच मार्गदर्शन लाभल्यामुळे मन सतत विस्तारणाऱ्या विचारांच्या आणि कृतीच्या दिशेने पुढे जात असते.
स्वातंत्र्याच्या अशा त्या स्वर्गात, हे माझ्या पित्या, माझ्या देशास जागृत होऊ दे.

हेही वाचा – Rajiv Ghai: भारतीय लष्कराने पाकचे कंबरडं मोडलं; 'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्षपूर्तीला लेफ्टनंट जनरल राजीव घईंचे मोठे विधान

आत्मिक शक्ती आणि आंतरिक मुक्ती
गीतांजलीच्या 35 व्या अध्यायातील ही कविता माणसाच्या अंतर्मनातील सामर्थ्यावर भाष्य करणारी जाणवते. टागोरांच्या मते, खरा स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या मनातील भीती, आत्मशंका आणि लोकांच्या टीकेच्या अडथळ्यांना पार केले पाहिजे. निर्भय आणि स्पष्टवक्ता होणे हीच खरी मुक्ती आहे. केवळ राजकीय बदल पुरेसा नसून, स्वतःशी सत्यनिष्ठ राहणे आणि सतत परिपूर्णतेच्या दिशेने प्रयत्न करणे हे प्रगतीसाठी आवश्यक आहे, हाच बोध या कवितेतून मिळतो.

वैयक्तिक आणि सामूहिक जागृती
माझा देश जागा होऊ दे, असा शेवट करताना टागोर वैयक्तिक मनाच्या आणि सामूहिक राष्ट्राच्या स्वातंत्र्याची सांगड घालतात. ते म्हणतात की, स्वातंत्र्याची पहिली ठिणगी व्यक्तीच्या मनात पेटली पाहिजे, जी नंतर संपूर्ण राष्ट्रात पसरेल. ईश्वरी मार्गदर्शनाने लोकांचे विचार आणि कृती सतत विस्तारत राहावी आणि भारत एका जागृत अवस्थेत जावा, ही त्यांची प्रार्थना आजही तितकीच प्रेरणादायी ठरते.

हेही वाचा – 8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; 10 वर्षांऐवजी आता दर 5 वर्षांनी वाढवावे वेतन, सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number