Ratan Tata Villa: रतन टाटा यांच्या व्हिलाची होणार विक्री; ‘या’ जुन्या मित्राने दिली 55 कोटींची ऑफर

सेशेल्समध्ये रहिवासीच रिअल इस्टेट खरेदी करू शकतात, मात्र रतन टाटांसाठी अपवादात्मक परवानगी दिली गेली होती. 1982 मध्ये टाटा मोटर्सने बेटातील वाहतूक सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Ratan Tata Villa: रतन टाटा यांच्या व्हिलाची होणार विक्री; ‘या’ जुन्या मित्राने दिली 55 कोटींची ऑफर

Ratan Tata Villa: दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या समुद्रकिनाऱ्यावरील व्हिलाच्या विक्रीसंदर्भात सध्या बाजारात जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन आणि त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी या व्हिलाला खरेदी करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांनी अंदाजे 6.2 दशलक्ष डॉलर (सुमारे 55 कोटी) या रकमेसाठी ऑफर दिल्याची माहिती आहे. मात्र सध्या औपचारिक करार झालेला नाही.

व्हिलाची किंमत आणि ऑफर

तज्ञांच्या मते, व्हिलाची किंमत सुमारे 8.5 दशलक्ष आहे. शिवशंकरन यांनी सध्या चर्चेवर उत्तर देताना सांगितले की, “तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे मला माहित नाही.” अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये या प्रकरणाशी परिचित असलेल्या व्यक्तींची माहिती समोर आली आहे, तरी कोणताही करार अद्याप अंतिम झालेला नाही.

हेही वाचा – Apple's 5th Store in India : 'या' ठिकाणी भारतात ॲपलचे सुरु होणार पाचवे स्टोअर, 11 डिसेंबरला शुभारंभ

रतन टाटांचा व्हिला खरेदी करण्याचा इतिहास

सेशेल्समध्ये रहिवासीच रिअल इस्टेट खरेदी करू शकतात, मात्र रतन टाटांसाठी अपवादात्मक परवानगी दिली गेली होती. 1982 मध्ये टाटा मोटर्सने बेटातील वाहतूक सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी, सी. शिवशंकर यांनी रतन टाटांना मालमत्ता खरेदी करण्यात मदत केली होती.

हेही वाचा – Kerala Sky Dining Incident: केरळमध्ये स्काय-डायनिंगचा थरार! 120 फूट उंचीवर अडकले पर्यटक; बचावकार्य सुरू

शिवशंकरन यांचा हेतू

शिवशंकरन यांना सेशेल्सचे नागरिकत्व असल्याने, त्यांनी रतन टाटांचा व्हिला खरेदी करण्याची इच्छा दर्शवली आहे. जर हा व्हिला विकला गेला, तर 16 जून 2025 च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टमध्ये मिळकत समान प्रमाणात वाटली जाईल. या फाउंडेशनद्वारे रतन टाटांनी अनेक भारतीय स्टार्टअप्सना आणि आरएनटी असोसिएट्सद्वारे विविध उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number