लग्नाचा खर्च 20 कोटीच्या घरात अन् इंटरनेटवर रचला जागतिक विक्रम! रश्मिका-विजयच्या लग्नाच्या व्हिडीओला विराट,मेसी-रोनाल्डोपेक्षाही मिळाले जास्त लाईक्स

रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले होते; परंतु, एका विशिष्ट व्हिडिओने आता जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

लग्नाचा खर्च 20 कोटीच्या घरात अन् इंटरनेटवर रचला जागतिक विक्रम! रश्मिका-विजयच्या लग्नाच्या व्हिडीओला विराट,मेसी-रोनाल्डोपेक्षाही मिळाले जास्त लाईक्स

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी सोशल मीडियाच्या जगात नवा इतिहास रचला आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या लग्नानंतर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओने जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओने केवळ भारतीय सेलिब्रिटींचेच नव्हे, तर फुटबॉल विश्वातील सम्राट मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचेही रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

26 फेब्रुवारीला अडकले लग्नाच्या बेडीत
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा विवाह सोहळा 26 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत दिमाखात पार पडला. हे लग्न केवळ दोन सेलिब्रिटींचे मिलन नव्हते, तर त्यात भारतीय संस्कृती आणि परंपरेची सुंदर झलक पाहायला मिळाली. लग्नातील भावनिक क्षण, विधी आणि दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले होते, परंतु एका विशिष्ट व्हिडिओने आता जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

8.4 मिलियन लाईक्ससह ग्लोबल रेकॉर्ड
लग्नानंतर रश्मिका आणि विजयने 'मान्यवर' (Manyavar) या ब्रँडसाठी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या लग्नाच्या आऊटफिटबद्दल गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर तब्बल 8.4 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वी एका ब्रँड कॅम्पेनसाठी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांचा व्हिडिओ 8.1 मिलियन लाईक्ससह अव्वल स्थानावर होता. रश्मिका आणि विजयच्या व्हिडिओने हा आकडा पार करत आता जगातील सर्वाधिक पसंती मिळालेला ब्रँड व्हिडिओ होण्याचा मान मिळवला आहे.

हेही वाचा – Prithvi Shaw Engagement: मैदानाबाहेर पृथ्वी शॉ 'क्लीन बोल्ड'! प्रेयसी आकृती अग्रवालसोबत थाटात उरकला साखरपुडा, पाहा खास फोटोज

मेसी, रोनाल्डो आणि विराट कोहलीही मागे
भारतीय क्रीडा विश्वातील आयकॉन विराट कोहलीचे सोशल मीडिया रेकॉर्ड्स जगजाहीर आहेत, मात्र रश्मिका आणि विजयच्या या 'वेडिंग' व्हिडिओने आता विराटसह मेसी आणि रोनाल्डो यांसारख्या ग्लोबल स्टार्सनाही लोकप्रियतेच्या शर्यतीत मागे टाकले आहे. चाहत्यांच्या मते, या व्हिडिओमधील दोघांची नैसर्गिक केमिस्ट्री, प्रेम आणि एकत्र असण्याचा आनंद लोकांना भावला आहे. भव्य व्हिज्युअल्स आणि व्हिडिओमधील गाण्याने सोशल मीडियावर एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे.

सर्वात चर्चेतील सेलिब्रिटी लग्न
या जागतिक विक्रमानंतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे लग्न इंटरनेटवरील आजवरच्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सेलिब्रिटी लग्नांपैकी एक ठरले आहे. फोटो, रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून हे जोडपे सतत ट्रेंडिंगमध्ये आहे. केवळ आकड्यांच्या जोरावरच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांच्या प्रेमामुळे या व्हिडिओने हे स्थान मिळवले आहे. आता रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ त्यांच्या प्रेमाचे एक ऐतिहासिक प्रतीक बनला आहे.

हेही वाचा – T20 World Cup Final: फायनलपूर्वी संगीताची मेजवानी! अहमदाबादमध्ये घुमणार 'दांडीया क्वीन' फाल्गुनी पाठकचा सुरेल आवाज आणि लागणार धडाकेबाज पंजाबी तडका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number