Tettiri Song Controversy: ‘टटीरी’ गाण्यावरून रॅपर बादशाह अडचणीत; हरियाणा पोलिसांची लूकआउट नोटीस, वाद वाढताच मागितली माफी

या गाण्यातील आक्षेपार्ह शब्द आणि सादरीकरणामुळे हरियाणा पोलिसांनी बादशाहविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला असून, त्याच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी केली आहे.

Tettiri Song Controversy: ‘टटीरी’ गाण्यावरून रॅपर बादशाह अडचणीत; हरियाणा पोलिसांची लूकआउट नोटीस, वाद वाढताच मागितली माफी

Tettiri Song Controversy: लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह आपल्या नवीन 'टटीरी' या गाण्यामुळे कायदेशीर पेचात अडकला आहे. या गाण्यातील आक्षेपार्ह शब्द आणि सादरीकरणामुळे हरियाणा पोलिसांनी बादशाहविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला असून, त्याच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी केली आहे. हा वाद गंभीर वळण घेत असल्याचे पाहून बादशाहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे.

पंचकुला पोलिसांची कठोर कारवाई
पंचकुला येथील सेक्टर 20 सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केवळ एफआयआर नोंदवला नाही, तर बादशाहला देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्याविरुद्ध 'लूकआउट सर्क्युलर' (LOC) जारी करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संबंधित गाण्याचा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्यासाठी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

शालेय गणवेश आणि आक्षेपार्ह शब्दांवर आक्षेप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्याच्या व्हिडिओमध्ये शालेय गणवेश परिधान केलेल्या अल्पवयीन मुली त्यांच्या बॅगा फेकून देताना आणि अभ्यासापासून दूर जाताना दाखवण्यात आले आहे. हे चित्रण शालेय आणि शैक्षणिक वातावरणाचे चुकीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. तसेच, गाण्यात महिला आणि मुलींबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. 'बादशाला' सारख्या शब्दांच्या वापरावरही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

"मी स्वतः हरियाणाचा आहे"; बादशाहचा माफीनामा
वाढता रोष पाहून बादशाहने एक स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ जारी केला. तो म्हणाला, "माझ्या नवीन गाण्यामुळे हरियाणातील लोक नाराज झाले असल्याचे मला समजले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः हरियाणाचा आहे आणि माझी बोलीभाषाही तीच आहे. तरीही, जर माझ्या शब्दांमुळे किंवा गाण्यामुळे कोणाची मने दुखावली असतील, तर मी मनापासून माफी मागतो." आता या माफीनाम्यानंतर पोलीस आपली भूमिका मवाळ करतात की कारवाई सुरूच ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number