Cancer Cases In India: कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर, कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण?

आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC – ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी) च्या आकडेवारीनुसार, भारतात कर्करोगाच्या रुग्णांची एकूण 1,413,316 असण्याचा अंदाज आहे.

Cancer Cases In India: कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर, कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण?

Cancer Cases In India: भारतामध्ये कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC – ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी) च्या  आकडेवारीनुसार, भारतात कर्करोगाच्या रुग्णांची एकूण 1,413,316 असण्याचा अंदाज आहे. दर 100,000 लोकसंख्येमागे 98.5 प्रकरणे अशी नोंद झाली आहे. भारतापुढे चीन (4.82 दशलक्ष रुग्ण) आणि अमेरिकेचा (2.38 दशलक्ष रुग्ण) क्रमांक लागतो

पाच वर्षांत 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

संसदेत सरकारने सादर केलेल्या माहितीवरून, कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 2020 मधील 13.92 लाखांवरून 2024 मध्ये 15.33 लाखांपर्यंत वाढली आहे. ही जवळपास 11 टक्क्यांची वाढ आहे. 2020 ते 2024 या काळात भारतात कर्करोग रुग्णांची वर्षनिहाय वाढ खालीलप्रमाणे आहे: 

2020: 13,92,179
2021: 14,26,447
2022: 14,61,427
2023: 14,96,972
2024: 15,33,055

दरवर्षी जवळपास 10 लाख नवीन रुग्ण कर्करोगाच्या विळख्यात सापडतात, असे अहवालात नमूद आहे.

हेही वाचा – Indigo Flight Cancellation: इंडिगो रद्द केलेल्या सर्व उड्डाणांची पूर्ण परतफेड करणार; केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर घेतला निर्णय

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण?

उत्तर प्रदेश: 2.21 लाख
महाराष्ट्र: 1.27 लाख
पश्चिम बंगाल: 1.18 लाख
बिहार: 1.15 लाख

सर्वाधिक वाढ कोणत्या प्रदेशांत?

केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्यांमध्ये ही वाढ अधिक वेगाने झाली आहे.

दमण: 39.51 टक्के
दादरा आणि नगर हवेली: 30.09 टक्के
सिक्कीम: 26.06 टक्के
लक्षद्वीप: 18.52 टक्के
मणिपूर: 18.48 टक्के

दिल्ली, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथेही 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदली गेली.

हेही वाचा – S. Jaishankar On PAK Army: 'भारताच्या अनेक अडचणींचे मूळ पाकिस्तानी सैन्य…'; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा असीम मुनीर यांच्यावर निशाणा

रुग्णसंख्या वाढण्याची प्रमुख कारणे

आयसीएमआरच्या मते, रुग्णांमध्ये वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. जीवनशैलीतील बदल, तंबाखू आणि मद्यपानाचे वाढते सेवन, वृद्ध लोकसंख्येतील वाढ आणि आरोग्य जागरूकता वाढल्यामुळे रुग्णांची तक्रार वाढली आहे. शहरी भागातील प्रदूषण देखील एक मोठे आव्हान बनले आहे. भारतात कर्करोग हा वेगाने वाढणारा आरोग्य आव्हान बनला आहे. त्याच्या प्रतिबंध, तपासणी आणि उपचारांसाठी व्यापक धोरणाची आवश्यकता आहे. येत्या काळात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणून आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार, जीवनशैली सुधारणे आणि तंबाखू नियंत्रण यावर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number