Ram Navami 2026 : रामनवमीला ‘नवपंचम’ राजयोगाचा शुभ संयोग! ‘या’ राशींना मिळणार पदोन्नती आणि व्यवसायात नफा

प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ग्रहांची ही स्थिती अनेक राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहे.

Ram Navami 2026 : रामनवमीला ‘नवपंचम’ राजयोगाचा शुभ संयोग! ‘या’ राशींना मिळणार पदोन्नती आणि व्यवसायात नफा

Ram Navami 2026 : यंदाची रामनवमी भाविकांसाठी आणि विशेषतः काही राशींच्या जातकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, या दिवशी 'नवपंचम', 'त्रिग्रही' आणि 'गजकेसरी' यांसारख्या शक्तिशाली राजयोगांचा दुर्मिळ संगम होत आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ग्रहांची ही स्थिती अनेक राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहे. 

रामनवमी 2026 : तिथी आणि शुभ मुहूर्त
यंदा रामनवमीच्या तिथीबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण असले तरी, प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी झाला असल्याने गृहस्थांसाठी 26 मार्च 2026 हा दिवस मुख्य मानला गेला आहे.
नवमी तिथी प्रारंभ: 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 वाजता.
नवमी तिथी समाप्ती: 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 वाजता.
उत्सव कधी साजरा करावा: प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव दुपारी साजरा केला जातो, म्हणून 26 मार्च रोजी गृहस्थ भाविक रामनवमी साजरी करतील, तर वैष्णव संप्रदायाचे लोक 27 मार्च रोजी हा सण साजरा करतील.

ग्रहांची स्थिती आणि राजयोगांचा वर्षाव
यावर्षी रामनवमीच्या दिवशी आकाशात ग्रहांची अद्भुत युती पाहायला मिळणार आहे. संपत्तीचा कारक शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे.
गजकेसरी राजयोग: गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे मिथुन राशीत हा योग तयार होत आहे.
नवपंचम राजयोग: गुरु आणि मंगळाच्या संयोगामुळे हा शुभ योग जुळून येत आहे.
त्रिग्रही योग: कुंभ आणि मीन राशीमध्ये तीन ग्रहांच्या एकत्र येण्याने 'डबल त्रिग्रही' योग तयार होत आहे.
याशिवाय, या दिवशी 'शोभन सर्वार्थ सिद्धी' आणि 'रवि योग' देखील असणार आहे, जे कार्यांमधील यशाची खात्री देतात.

हेही वाचा – Ramnavami 2026 : रामनवमीला नक्की करा नशिबाची दारे उघडणारे 'हे' 3 प्रभावी उपाय; जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि रामजन्मोत्सवाचे महत्त्व

'या' भाग्यशाली राशींवर होणार प्रभू रामांची कृपा
रामनवमीचा हा शुभ काळ मेष, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचा ठरेल. या राशींच्या लोकांना मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
कार्यक्षेत्रात प्रगती: नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती (Promotion) मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक लाभ: व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कौटुंबिक सुख: कुटुंबातील जुने वाद मिटतील आणि नातेसंबंधांत गोडवा येईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.
इतर राशी: मिथुन, कुंभ, तूळ, मकर आणि सिंह राशीसाठी हा काळ मध्यम ते चांगला राहील. मात्र, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

यशप्राप्तीसाठी रामनवमीचे सोपे उपाय
भगवान श्रीरामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय करणे फलदायी ठरते:
रामरक्षा: रामनवमीच्या दिवशी श्री बुधकौशिक ऋषी विरचित रामक्षेचे पठण करणे अत्यंत शुभफलदायी मानले जाते. तसेच, या स्तोत्राचे दररोज पठण करणे जीवनात शांती, तृप्ती आण समाधान घेऊन येते.
रामचरितमानस: रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस मधील 'बालकांडा'चा पाठ करावा.
तुळस अर्पण: श्रीरामांना तुळशीच्या पानांची माळ अर्पण करावी.
हनुमान चालीसा: या दिवशी हनुमान चालीसाचे पठण केल्याने संकटे दूर होतात आणि रखडलेली कामे पूर्ण होतात.

हेही वाचा – Vastu Tips For Placing God Photo Frames : घरामध्ये देवी – देवतांचे फोटो अशा पद्धतीने लावा; सुख-समृद्धीसह धनसंपत्तीतही होईल वृद्धी 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number