Raja Shivaji Break Sairat Record : ‘राजा शिवाजी’ने मोडला ‘सैराट’चा रेकॉर्ड; 17 दिवसांत केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

गेल्या दशकभरापासून मराठी चित्रपटसृष्टीत अढळ राहिलेला नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'चा विक्रम अखेर मोडीत निघाला आहे.

Raja Shivaji Break Sairat Record : ‘राजा शिवाजी’ने मोडला ‘सैराट’चा रेकॉर्ड; 17 दिवसांत केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

Raja Shivaji Break Sairat Record :  रितेश देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा इतिहास लिहिला आहे. गेल्या दशकभरापासून मराठी चित्रपटसृष्टीत अढळ राहिलेला नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'चा विक्रम अखेर मोडीत निघाला आहे. अवघ्या 17 दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार करत मराठी सिनेमाची ताकद जगभरात सिद्ध केली आहे.

10 वर्षांचा 'सैराट'चा रेकॉर्ड अखेर मोडला
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट'ने 110 कोटींची जागतिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोच्च स्थान गाठले होते. गेल्या 10 वर्षात अनेक सुपरहिट चित्रपट आले, मात्र हा आकडा कोणालाही पार करता आला नव्हता. अखेर 'राजा शिवाजी'ने अवघ्या 3 आठवड्यांत 114.8 कोटींचा गल्ला जमवून मराठीतील 'सर्वात यशस्वी चित्रपट' होण्याचा बहुमान मिळवला आहे.

बॉक्स ऑफिसवर घोडदौड

पहिला आठवडा: 50 कोटींहून अधिकची वेगवान कमाई.
भारतीय बॉक्स ऑफिस: एकट्या भारतात 109.9 कोटींचा व्यवसाय.
जागतिक कमाई (World Wide): 114.8 कोटींचा टप्पा पार.

का ठरला हा चित्रपट खास?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे भव्य सादरीकरण आणि रितेश देशमुख यांचा दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर पॅन इंडिया स्तरावर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे. यापूर्वी 'वेड' आणि 'बाईपण भारी देवा' सारख्या चित्रपटांना मागे टाकल्यानंतर आता या सिनेमाने 'सैराट'च्या विक्रमावरही आपले नाव कोरले आहे.

हेही वाचा – Bhumika Natak: रंगभूमीवर गाजलेल्या ‘भूमिका’चा मोठा मान! सचिन खेडेकरांच्या नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

मराठी सिनेमाचा 'अटकेपार झेंडा'
रितेश देशमुख यांच्या या दिग्दर्शकीय प्रयत्नाने मराठी चित्रपट केवळ आशय नाही, तर व्यावसायिकदृष्ट्याही 'बाहुबली' किंवा 'आरआरआर' सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीस तोड ठरू शकतात, हे दाखवून दिले आहे. आगामी काळात हा चित्रपट आणखी कोणते नवे विक्रम प्रस्थापित करणार, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number