Pranit More on Jokes on Salman Khan : पुन्हा सलमान खानवर विनोद करणार का? प्रणित मोरेने दिलं उत्तर, ‘हात जोडले…’

प्रणित बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्याचे जुने व्हिडिओ प्रसारित झाले होते. आपल्यावर प्रणितने विनोद (Jokes) केल्याचं समजल्यानंतर सलमानने सुरुवातीला त्याला सुनावले होते. पण..

Pranit More on Jokes on Salman Khan : पुन्हा सलमान खानवर विनोद करणार का? प्रणित मोरेने दिलं उत्तर, ‘हात जोडले…’

Pranit More Talks about Jokes on Salman khan : ‘बिग बॉस’ हिंदीचा 19 वा सिझन (Big Boss Season 19) नुकताच संपला. यशस्वी ठरलेल्या या सिझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. फरहाना भट्ट दुसरी तर मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी देखील प्रणित मोरे सोशल मीडियावर (Social Media) विशेष चर्चेत असायचा. त्याने अनेक बॉलिवूड कलाकारांची त्याच्या शोमध्ये खिल्ली उडवली होती, ज्यात सलमान खानचाही समावेश होता.

सलमानने जुने व्हिडिओ पाहून केले होते माफ
प्रणित बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्याचे जुने व्हिडिओ प्रसारित झाले होते. आपल्यावर प्रणितने विनोद (Jokes) केल्याचं समजल्यानंतर सलमानने सुरुवातीला त्याला सुनावले होते. पण “माझ्यामुळे जर कोणाचे पोट भरणार असेल, घर चालणार असेल, तर ते मला चालेल…” असे म्हणत सलमानने मोठ्या मनाने त्याला माफही केले होते.

हेही वाचा – Big Boss Marathi: ढोल-ताशांच्या गजरात रितेश भाऊची एंट्री, बिग बॉस मराठी 6 चा टीझर आऊट

टॉप 3 मध्ये पोहोचल्यावर चर्चा
प्रणितने सलमान खानशी पंगा घेतल्याने तो स्पर्धेत फार काळ टिकणार नाही, सलमान त्याला शेवटपर्यंत टिकू देणार नाही, अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होत्या. पण तसं न होता प्रणित टॉप 3 (Top 3) पर्यंत पोहोचला. त्यामुळे, प्रणित आता पुन्हा सलमानची खिल्ली उडवणार का? त्याच्यावर विनोद करणार का? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

पापाराझीचा प्रश्न आणि प्रणितचे उत्तर
बिग बॉसच्या 19 व्या पर्वाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला सगळेच स्पर्धक हजर होते. यावेळी प्रणित मोरे आणि अभिषेक एकत्र दिसले. हा चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. याच दरम्यान पापाराझींनी प्रणितला विचारले की, “आता परत सलमानवर व्हिडिओ बनवणार का, म्हणजेच सलमान खानवर विनोद मारणार का?” या प्रश्नावर प्रणितने काहीच न बोलता हसत हसत हात जोडले.

हेही वाचा – Santosh Juvekar: ‘संत्या, आता तरी बघ की रे’ अक्षय खन्नाच्या व्हायरल सीनवरून नेटकऱ्यांनी पुन्हा संतोष जुवेकरला धरलं वेठीस

प्रणितने संपवला विषय
विनोदी पद्धतीने प्रणितने या विषयाला पूर्णविराम दिला. प्रणितने हसून हात जोडल्यानंतर अभिषेक म्हणाला की, “ते कधीच माफ करायचे नाहीत.” यावर प्रणित पुन्हा म्हणाला की, “मी आनंदी, खुश राहावं असं वाटत नाहीये का तुम्हाला? चांगले आहेत यार आपले सलमान भाऊ, खरंच खूप चांगले आहेत,” असं तो म्हणाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number