Amarnath Yatra 2026: अमरनाथ यात्रेसाठी पोलिसांची नवी वाहतूक नियमावली जारी; यात्रेकरूंना 10 लाख विम्यासह मिळणार ‘या’ खास सुविधा

येत्या 3 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Amarnath Yatra 2026: अमरनाथ यात्रेसाठी पोलिसांची नवी वाहतूक नियमावली जारी; यात्रेकरूंना 10 लाख विम्यासह मिळणार ‘या’ खास सुविधा

Amarnath Yatra 2026: अमरनाथ यात्रा 2026 अत्यंत सुरक्षित आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी विशेष वाहतूक मार्गदर्शक सूचना (अ‍ॅडव्हायझरी) जारी केल्या आहेत. येत्या 3 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून यात्रेदरम्यान 'नव्याग बोगद्यातून' (Navyug Tunnel) होणाऱ्या सर्वसामान्य वाहतुकीवर विशिष्ट वेळेत निर्बंध लादण्यात आले आहेत.

नव्याग बोगदा आणि वाहतुकीसाठी निश्चित केलेल्या वेळा
नवीन नियमांनुसार, काश्मीरकडून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या सामान्य वाहनांना दररोज सकाळी 11:30 पूर्वी नव्याग बोगदा ओलांडता येणार नाही. तसेच, जम्मूवरून काश्मीरकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी 3:00 नंतर या बोगद्यात प्रवेश बंदी असेल. याशिवाय, मीर बाजार येथून श्रीनगर आणि अनंतनागकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दुपारी 4:00 ही अंतिम वेळ (कट-ऑफ टाईम) निश्चित करण्यात आली आहे, तर नव्याग बोगद्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी सायंकाळी 5:00 पूर्वी तो ओलांडणे बंधनकारक राहील.

भाविकांच्या अपघात विम्यात मोठी वाढ 
एकूण 57 दिवस चालणाऱ्या या अमरनाथ यात्रेकरूंसाठी 'श्री अमरनाथ श्राइन बोर्ड'ने एक मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नोंदणीकृत भाविकांच्या अपघात विम्याची रक्कम दुप्पट करण्यात आली असून, ती आता 5 लाख रुपयांवरून थेट 10 लाख रुपये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या वाढीव विमा संरक्षणासाठी भाविकांना कोणताही अतिरिक्त प्रिमियम किंवा शुल्क द्यावे लागणार नाही. हे विमा संरक्षण केवळ भाविकांनाच नव्हे, तर श्राइन बोर्डाचे कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि यात्रेशी संबंधित हंगामी कामगारांनाही लागू असेल. यासोबतच वैध परवाना असणाऱ्या भाविकांना मोफत निवासाची सोयही बोर्डातर्फे दिली जाणार आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज; मार्गावर उभारली दोन विशेष फील्ड हॉस्पिटल्स
यात्रेदरम्यान प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने 1,000 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात्रेच्या मुख्य मार्गांवर प्रत्येकी 70 खाटांची क्षमता असलेली 2 सुसज्ज 'फील्ड हॉस्पिटल्स' (तात्पुरती रुग्णालये) उभारण्यात आली आहेत. यासोबतच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्राथमिक आणि गंभीर उपचारांच्या सोयींनी युक्त अशा 100 रुग्णवाहिका संपूर्ण मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – CM Vijay Speech: आधी जनता, मग पक्ष! थलपती विजय यांचं विधानसभेत सिनेस्टाइल भाषण; 'त्या' एका कृतीने जिंकली उपस्थितांची मनं

प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे पोलिसांचे आवाहन
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही प्रकारची घाई टाळण्यासाठी आणि सुरक्षा तपासणीसाठी पुरेसा वेळ हाती ठेवूनच प्रवासाला सुरुवात करावी, असे पोलिसांनी म्हटले आहे. यंदाची ही 57 दिवसांची यात्रा पारंपरिक 48 किलोमीटर लांबीच्या 'नुनवान-पहलगाम' मार्गाने आणि कमी अंतराच्या परंतु आव्हानात्मक अशा 14 किलोमीटरच्या 'बालताल' मार्गाने पूर्ण होईल. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधून या यात्रेची सांगता होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number