PM Vishwakarma Yojana: कारागिरांसाठी केंद्र सरकारची मोठी भेट! 18 कामांचे प्रशिक्षण आणि 3 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?

ही योजना प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे जे आपल्या हातांच्या कौशल्याने उदरनिर्वाह करतात. कारागिरांना आर्थिक मदतीसह 'विश्वकर्मा' म्हणून नवी ओळख मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

PM Vishwakarma Yojana: कारागिरांसाठी केंद्र सरकारची मोठी भेट! 18 कामांचे प्रशिक्षण आणि 3 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?

PM Vishwakarma Yojana: केंद्र सरकारने देशातील पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'पीएम विश्वकर्मा योजना' सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून हाताने काम करणाऱ्या 18 विविध क्षेत्रांतील कारागिरांना प्रशिक्षणासोबतच अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील कारागिरांना या योजनेचा मोठा लाभ मिळत असून, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?
ही योजना प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे जे आपल्या हातांच्या कौशल्याने उदरनिर्वाह करतात. कारागिरांना केवळ आर्थिक मदत करणे हाच या योजनेचा हेतू नसून, त्यांना 'विश्वकर्मा' म्हणून नवी ओळख मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे. यामध्ये कारागिरांना आधुनिक हत्यारे, प्रगत प्रशिक्षण आणि बाजारपेठेशी जोडण्याची संधी दिली जाते.

योजनेचे प्रमुख फायदे आणि मिळणाऱ्या सुविधा
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालील सुविधा पुरवल्या जातात – 
– प्रशिक्षण आणि स्टायपेंड: मास्टर ट्रेनर्सद्वारे कारागिरांना मूलभूत (Basic) आणि प्रगत (Advanced) कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना दररोज 500 रुपये स्टायपेंड दिला जातो.
– टूलकिट प्रोत्साहन: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कारागिरांना आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाते.
– प्रमाणपत्र आणि ओळखपत्र: लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाते, ज्यामुळे त्यांना अधिकृत कारागीर म्हणून मान्यता मिळते.
– डिजिटल व्यवहार प्रोत्साहन: डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येक व्यवहारावर इन्सेंटिव्ह दिला जातो.

हेही वाचा – Railway Recruitment 2026 : रेल्वेमध्ये 5000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; 10 वी उत्तीर्ण आणि ITI धारकांसाठी सुवर्णसंधी, 'असा' करा अर्ज

दोन टप्प्यांत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कारागिरांना कोणत्याही गॅरंटीशिवाय (Collateral-free) कर्ज दिले जाते:
पहिला टप्पा: व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला 1,00,000 रुपयांचे कर्ज मिळते.
दुसरा टप्पा: व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात 2,00,000 रुपयांपर्यंत कर्ज घेता येते.
व्याजदर: या कर्जावर सरकार केवळ 5 टक्के व्याज आकारते, जे बाजारातील इतर कर्जांच्या तुलनेत अतिशय कमी आहे.

योजनेसाठी पात्र असलेले 18 पारंपरिक व्यवसाय
या योजनेत एकूण 18 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे:
सुतार (Carpenters), नाव निर्माता (Boat Makers), अस्त्रकार (Armourers), लोहार (Blacksmiths), हातोडा आणि टूलकिट निर्माते, कुलूप बनवणारे (Locksmiths), सोनार (Goldsmiths), कुंभार (Potters), शिल्पकार/मूर्तिकार, दगड फोडणारे (Stone breakers), मोची/चर्मकार, गवंडी (Rajmistri), टोपली/चटई/झाडू बनवणारे, बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी (Barber), माळकरी (Garland makers), धोबी (Washermen), शिंपी (Tailor) आणि मासेमारीचे जाळे विणणारे.

कोणाला लाभ मिळणार नाही?
सरकारी कर्मचारी, खाजगी नोकरी करणारे किंवा मोठे व्यवसाय चालवणारे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत. ही योजना केवळ अल्पभूधारक किंवा हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागिरांसाठी मर्यादित आहे.

अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत –
1. ऑनलाईन: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://pmvishwakarma.gov.in/ जाऊन नोंदणी करता येईल.
2. ऑफलाईन: ज्यांना इंटरनेट वापरता येत नाही, ते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊन आधार कार्ड आणि बायोमेट्रिकद्वारे नोंदणी करू शकतात.

हेही वाचा – Career After 10th Exam: दहावी पास आहात? कमी खर्चात आणि लवकर नोकरी मिळवून देणारे 'हे' सर्वोत्तम कोर्सेस जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number