Constitution Day 2025: आज भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात महत्वाची तारीख आहे. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले. संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना खुलं पत्र लिहीत भारतीय संविधानाची महानता, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आणि पहिल्यांदा मतदार बनणाऱ्या तरुणांचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करत त्यांच्या पत्राची लिंक शेअर केली. त्यांनी लिहिले आहे की, ‘आपले संविधान हे पवित्र दस्तऐवज आहे. याच संविधानाच्या शक्तीने एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला देशाचा पंतप्रधान होण्याचा सन्मान मिळाला.’ मोदींनी आठवण करून दिली की 2014 मध्ये संसद भवनात प्रथम प्रवेश करताना त्यांनी लोकशाहीच्या मंदिराला नतमस्तक होत सलाम केला होता. 2019 मध्येही त्यांनी संविधानासमोर डोके टेकवून आदर व्यक्त केला.
हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ची कारवाई; दहशदवादी उमरला मदत करणाऱ्या शोएबला अटक
मूलभूत कर्तव्यांची महत्त्वपूर्ण आठवण
या पत्रात पंतप्रधानांनी संविधानातील कलम 51अ चा विशेष उल्लेख केला. त्यांनी लिहिले, “मूलभूत कर्तव्ये आपल्याला सामाजिक–आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवतात. महात्मा गांधी म्हणायचे नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडली तर त्यांच्या अधिकारांचे रक्षण आपोआप होते.” त्यांनी नागरिकांना आवाहन केले की प्रत्येक कृती संविधान बळकट करणारी आणि राष्ट्रीय हिताची असावी. “देशाने आपल्याला खूप दिले आहे. आपण त्याबद्दल कृतज्ञ असायला हवे.”
संविधान दिवस पर मैंने देशभर के अपने परिवारजनों के नाम एक पत्र लिखा है। इसमें हमारे संविधान की महानता, जीवन में मौलिक कर्तव्यों का महत्त्व और हमें पहली बार मतदाता बनने का उत्सव क्यों मनाना चाहिए, ऐसे कई विषयों पर अपने विचार साझा किए हैं…https://t.co/6SsfdWIUsO — Narendra Modi (@narendramodi) November 26, 2025
पहिल्यांदा मतदार होणाऱ्या युवकांना अभिमानाचा सन्मान
दरम्यान, पंतप्रधानांनी पत्रात विशेषतः युवा मतदारांसाठी संदेश दिला आहे. ‘संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे आणि मतदान करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे. 26 नोव्हेंबर रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांसाठी शाळा–महाविद्यालयांमध्ये सन्मान सोहळे आयोजित झाले पाहिजेत,’ असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी सुचवले की दरवर्षी संविधान दिनी पहिल्यांदाच मतदार बनणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याची परंपरा सुरू झाली पाहिजे. तरुणांमध्ये जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण झाली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांना समर्पित राहतील, आणि हाच मजबूत राष्ट्राचा पाया ठरेल, असे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.