Ivanka Trump: ट्रम्प यांची कन्या इव्हांकाला संपवण्याचा कट उधळला; आरोपी जेरबंद, कोण होता मास्टरमाईंड? वाचा

इराणच्या आयआरजीसी (IRGC - इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) या लष्करी संघटनेशी संबंधित असलेल्या एका प्रशिक्षित दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी जेरबंद केले आहे.

Ivanka Trump: ट्रम्प यांची कन्या इव्हांकाला संपवण्याचा कट उधळला; आरोपी जेरबंद, कोण होता मास्टरमाईंड?  वाचा

Ivanka Trump: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय सुरक्षेला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प हिच्या हत्येचा एक मोठा कट अमेरिकन तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. इराणच्या आयआरजीसी (IRGC – इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) या लष्करी संघटनेशी संबंधित असलेल्या एका प्रशिक्षित दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या या संशयित आरोपीकडून इव्हांका ट्रम्प यांच्या निवासस्थानाचा संपूर्ण नकाशा आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

कमांडर कासेम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा होता उद्देश
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याची ओळख 32 वर्षीय 'मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी' अशी पटली आहे. तो मूळचा इराकी नागरिक असून, 'कताइब हिजबुल्लाह' (Kata'ib Hezbollah) या अत्यंत धोकादायक आणि जहाल संघटनेचा वरिष्ठ सदस्य आहे. ड्रोन हल्ल्यात ठार झालेले इराणचे तत्कालीन लष्करी कमांडर कासेम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेणे, हाच अल-सादीचा मुख्य उद्देश होता. सुलेमानी यांच्या हत्येनंतर अल-सादी हा लोकांमध्ये फिरून इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येची भाषा करत असे, जेणेकरून डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच घरात मोठा धक्का देता येईल, असा त्याचा मनसुबा होता.

फ्लोरिडा येथील निवासस्थानी ड्रोन किंवा आत्मघाती हल्ल्याची होती योजना
वॉशिंग्टन येथील इराकी दूतावासाचे माजी अधिकारी 'एंतिफाध कानबार' यांनी अमेरिकन माध्यमांशी बोलताना या कटाची भीषणता स्पष्ट केली. अल-सादीने इव्हांका ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील आलिशान निवासस्थानाचा संपूर्ण आराखडा (ब्लूप्रिंट) आणि गुपित माहिती गोळा केली होती. केवळ इव्हांकाची हत्येचाच नव्हे, तर कताइब हिजबुल्लाह ही संघटना अमेरिकेतील विविध महत्त्वाच्या ठिकाणांवर आणि शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचीही धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

हेही वाचा – Tulsi Gabbard: अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांचा अचानक राजीनामा; पतीच्या आजारपणाचे दिले कारण, पण ‘रॉयटर्स’चा वेगळाच दावा, नेमकं काय घडलं?

ट्रम्प कुटुंबाच्या सुरक्षेत प्रचंड वाढ; संपूर्ण अमेरिकेत हाय अलर्ट
इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा हा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आल्यानंतर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा (हाय अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. आयआरजीसीच्या निशाण्यावर केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नसून त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, व्हाइट हाऊस आणि अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number