‘पाणी थांबवले तर…130 अण्वस्त्रे तयार आहेत’; पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला धमकी

पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.

‘पाणी थांबवले तर…130 अण्वस्त्रे तयार आहेत’; पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला धमकी
Edited Image

इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पंतप्रधानांसह पाकिस्तानचे अनेक नेते दररोज भारताला नवा इशारा देत आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ.

आमच्याकडे 130 अणुबॉम्ब तयार  – 

पत्रकार परिषदेत कडक भूमिका घेत हनीफ अब्बासी म्हणाले, 'आपली सर्व क्षेपणास्त्रे आता भारताकडे वळली आहेत, जर भारताने कोणत्याही प्रकारचे दुष्प्रयास करण्याचा निर्णय घेतला तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब आहे. आम्ही आमची गोरी, शाहीन, गझनवी सारखी क्षेपणास्त्रे आणि 130 अणुबॉम्ब फक्त भारतासाठी ठेवले आहेत, असा इशारा अब्बासी यांनी भारताला दिला आहे. 

हेही वाचा – पाकिस्तान चक्रावला; लाहोर विमानतळाला आग कुणी लावली?

राजनैतिक प्रयत्नांसोबतच, आम्ही आमच्या सीमांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी केली आहे. पहलगाम हल्ला हे फक्त एक निमित्त आहे, प्रत्यक्षात सिंधू पाणी करार भारताच्या रडारवर आहे. पाकिस्तान रेल्वे नेहमीच त्यांच्या सैन्याला मदत करण्यास तयार आहे, असं हनीफ अब्बासी यांनी म्हटलं आहे. तथापि, हनीफ यांच्या आधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पहलगाममध्ये निःशस्त्र पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या लष्कर दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून वर्णन केले होते.

हेही वाचा –  कुलगाममध्ये लष्कर आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई; अतिरेक्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक

बिलावल भुट्टो यांनी दिला इशारा – 

दरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही एका जाहीर सभेत भारताला धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, 'सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर आपले पाणी सिंधूमध्ये वाहेल किंवा त्यांचे रक्त वाहिल.' 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number