Rafale Marine Deal: पाकिस्तानची पोटदुखी! भारतातर्फे विकतं घेतल्या जाणाऱ्या राफेलबाबत जगभरात पसरवली खोटी माहिती

फ्रेंच एजन्सीच्या अहवालानुसार, हा अपप्रचार भारताच्या अब्जावधी डॉलर्सच्या संरक्षण कराराबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी केला गेला.

Rafale Marine Deal: पाकिस्तानची पोटदुखी! भारतातर्फे विकतं घेतल्या जाणाऱ्या राफेलबाबत जगभरात पसरवली खोटी माहिती

Rafale Marine Deal: भारताच्या संरक्षण सिद्धतेवर जागतिक स्तरावर चिखलफेक करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा 'फेक न्यूज'चा आधार घेतला आहे. भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या 26 राफेल मरीन (Rafale Marine) लढाऊ विमानांच्या कराराबाबत पाकिस्तानने रचलेले खोटेपणाचे जाळे फ्रान्सच्या सरकारी तपास यंत्रणेने (VIGINUM) उघडकीस आणले आहे.

बनावट पत्रांद्वारे गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न

फ्रेंच एजन्सीच्या अहवालानुसार, हा अपप्रचार भारताच्या अब्जावधी डॉलर्सच्या संरक्षण कराराबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी केला गेला. या मोहिमेची सुरुवात 25 नोव्हेंबर रोजी झाली. पाकिस्तानी डिजिटल तज्ञांनी डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांचे एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. पाकिस्तानी डिजिटल तज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांचे बनावट पत्र पोस्ट केले. त्या व्यक्तीने डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांच्या नावाने खोटा दावा केला की भारताच्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतसाठी राफेल मरीन जेटच्या डिलिव्हरीला मोठा विलंब होत आहे. पत्रात असेही म्हटले आहे की विमाने पोहोचवण्यापूर्वी भारतीय वैमानिकांना नवी दिल्लीत दहा आठवड्यांचे अनिवार्य प्रशिक्षण घ्यावे लागेल. इतकेच नव्हे तर, 8 डिसेंबर रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या नावानेही एक बनावट पत्र प्रसिद्ध करण्यात आले, ज्यामध्ये विलंबावरून फ्रेंच राजदूतांवर टीका केल्याचा खोटा बनाव रचण्यात आला होता.

हेही वाचा – PM Modi: सातासमुद्रापार मोदींची जादू! एका फोन कॉलने या देशातील सूत्रे फिरवली, आता शेतकऱ्यांसाठी फायदेच फायदे

डसॉल्ट एव्हिएशनने पाळले मौन

या प्रकरणावर फ्रेंच माध्यमांनी डसॉल्ट एव्हिएशनशी संपर्क साधला असता, कंपनीने कोणतीही अधिकृत टिप्पणी करण्यास नकार दिला. चुकीच्या माहितीला अधिक महत्त्व मिळून अफवांचा प्रसार वाढू नये, यासाठी कंपनीने हे धोरण स्वीकारल्याचे समजते.

हेही वाचा – "मी हताश झालोय, मला वाचवा!" युक्रेनच्या तावडीत सापडलेल्या गुजरातच्या तरुणाची पंतप्रधान मोदींना साद

यापूर्वीही केला होता दावा

पाकिस्तानकडून अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे महिन्यातही पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सवरून भारताचे राफेल विमान पाडल्याचा हास्यास्पद दावा करण्यात आला होता, जो भारत सरकारने तातडीने फेटाळून लावला होता. अमेरिका आणि इतर गुप्तचर संस्थांच्या मते, असा प्रचार फ्रेंच संरक्षण निर्यातीवरील विश्वास कमी करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी देशांच्या शस्त्रास्त्रांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो. राफेल मरीनच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद प्रचंड वाढणार असून, ती पाकिस्तान आणि चीनसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number