भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थरकाप! आता 120 किमी अंतराच्या ‘फतेह’ क्षेपणास्त्राची केली चाचणी

घाबरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली क्षेपणास्त्र शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'फतेह' क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थरकाप! आता 120 किमी अंतराच्या ‘फतेह’ क्षेपणास्त्राची केली चाचणी
Edited Image

इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी कारवाईची भीती वाटत आहे. तथापि, घाबरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली क्षेपणास्त्र शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'फतेह' क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र 120 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते, असा दावा केला जात आहे.

फतेह क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये – 

फतेह क्षेपणास्त्र हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे एक घन इंधनावर आधारित क्षेपणास्त्र आहे, ज्यामुळे ते लवकर प्रक्षेपित केले जाऊ शकते. ते पारंपारिक आणि अपारंपारिक (अण्वस्त्रे) शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम मानले जाते. पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांच्याकडे आधुनिक नेव्हिगेशन सिस्टीम आहे जी ती अचूक करते.

हेही वाचा – भारत-पाक वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी; पाकिस्तान घाबरला,बैठक बोलावण्याची केली विनंती

अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी – 

दरम्यान, भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने यापूर्वी अब्दाली शस्त्र प्रणालीची चाचणी घेतली होती, जी जमिनीपासून पृष्ठभागावर 450 किलोमीटर अंतरावर मारा करू शकते. अब्दाली क्षेपणास्त्र चाचणीनंतर, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना अभिनंदन केले होते.

हेही वाचा – पाकिस्तानचा थरकाप! राष्ट्रपतींनी मध्यरात्री बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन

पाकिस्तानची रशियाला हस्तक्षेप करण्याची विनंती –  

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. त्यानंतर पाकिस्तानची युद्धाच्या भीतीने घाबरगुंडी उडाली आहे. आता पाकिस्तानने रशियाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानचे मॉस्कोमधील राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी तणाव कमी करण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number