Padma awards 2026 : भारत सरकारच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानाच्या पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेले हे भारतातील प्रतिष्ठित पुरस्कार आज विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात 2026 च्या या पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. सरकारने 25 जानेवारी रोजी एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. आज सोमवारी पहिल्या टप्प्यात 66 (2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री) मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पद्मविभूषण 2026
पद्मविभूषण 2026 या पुरस्काराने कला, साहित्य आणि सार्वजनिक क्षेत्रातील 5 दिग्गज व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या विजेत्यांची यादी अशी आहे –
विजेत्यांची नावे –
धर्मेंद्र सिंग देओल (मरणोत्तर): कला क्षेत्र (महाराष्ट्र)
के. टी. थॉमस: सार्वजनिक व्यवहार (केरळ)
एन. राजम: कला क्षेत्र (उत्तर प्रदेश)
पी. नारायणन: साहित्य आणि शिक्षण (केरळ)
व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर): सार्वजनिक व्यवहार (केरळ)
पद्मभूषण 2026
याशिवाय, देशात महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 13 व्यक्तींना 'पद्मभूषण 2026' या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील या पुरस्कार विजेत्यांची नावे अशी आहेत –
विजेत्यांची नावे –
अलका याज्ञिक: कला क्षेत्र (महाराष्ट्र)
भगतसिंग कोश्यारी: सार्वजनिक व्यवहार (उत्तराखंड)
के. आर. पलानीस्वामी: वैद्यकीय क्षेत्र (तामिळनाडू)
मम्मूट्टी: कला क्षेत्र (केरळ)
डॉ. नोरी दत्तात्रेयुडू: वैद्यकीय क्षेत्र (अमेरिका)
पीयूष पांडे (मरणोत्तर): कला क्षेत्र (महाराष्ट्र)
एस. के. एम. मैलानंदन: सामाजिक कार्य (तामिळनाडू)
शतावधानी आर. गणेश: कला क्षेत्र (कर्नाटक)
शिबू सोरेन (मरणोत्तर): सार्वजनिक व्यवहार (झारखंड)
उदय कोटक: व्यापार आणि उद्योग (महाराष्ट्र)
व्ही. के. मल्होत्रा (मरणोत्तर): सार्वजनिक व्यवहार (दिल्ली)
वेल्लापल्ली नटेशन: सार्वजनिक व्यवहार (केरळ)
विजय अमृतराज: क्रीडा क्षेत्र (अमेरिका)
पद्मश्री 2026
कला, साहित्य, शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, विज्ञान, समाजकार्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 113 व्यक्तींना केंद्र सरकारच्या वतीने 'पद्मश्री 2026' हा नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. विविध राज्यांतील आणि क्षेत्रांतील या पुरस्कार विजेत्यांची यादी अशी आहे –
विजेत्यांची नावे –
महाराष्ट्र : कला क्षेत्रातून भिकल्या लाडक्या धिंदा, माधवन् रंगनाथन, रघुवीर तुकाराम खेडकर आणि सतीश शाह (मरणोत्तर), क्रीडा क्षेत्रातून रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातून आर्मिडा फर्नांडिस, उद्योग क्षेत्रातून अशोक खाडे व सत्यनारायण नुवाल, विज्ञान क्षेत्रातून जुझर वासी, कृषी क्षेत्रातून श्रीरंग देवाबा लाड आणि समाजकार्यासाठी जनार्दन बापूराव बोथे यांना पद्मश्री प्रदान करण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्र : महाराष्ट्राच्या रोहित शर्मा व्यतिरिक्त पंजाबची हरमनप्रीत कौर भुल्लर (क्रिकेट), पंजाबचे बलदेव सिंग, मध्य प्रदेशचे भगवानदास रायकवार, पुद्दुचेरीचे के. पाजनीवेल, उत्तर प्रदेशचे प्रवीण कुमार, हरियाणाची सविता पुनिया आणि जॉर्जियाचे व्लादिमीर मेस्तविरीशविली (मरणोत्तर) यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
कला आणि संस्कृती : उत्तर प्रदेशचे अनिल कुमार रस्तोगी व चिरंजी लाल यादव, गुजरातचे अरविंद वैद्य व धार्मिकलाल पंड्या, बिहारचे भारत सिंह भारती व बिश्वा बंधू (मरणोत्तर), पश्चिम बंगालचे प्रसेनजीत चटर्जी, तरुण भट्टाचार्य व ज्योतीष देवनाथ, आसामचे हरिचरण सैकिया व नुरुद्दीन अहमद आणि तामिळनाडूच्या गायत्री बालसुब्रमण्यम व रंजनी बालसुब्रमण्यम (जोडी) यांचा यात समावेश आहे.
विज्ञान, शिक्षण आणि इतर क्षेत्र : दिल्लीचे मामिडाला जगदेश कुमार (शिक्षण), तामिळनाडूचे व्ही. कामकोटी (विज्ञान), केरळचे ए. ई. मुथुनायगम (विज्ञान), लडाखचे डॉ. पद्म गुरमेट (वैद्यकीय), कर्नाटकचे अंके गोवडा एम. (समाजकार्य), जर्मनीचे प्रा. लार्स-ख्रिश्चन कोच (कला) आणि रशियाच्या ल्युडमिला खोखलोव्हा (साहित्य व शिक्षण) यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.