Monalisa Wedding: महाकुंभात व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेली मुलगी मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लिम प्रियकर फरमान याच्याशी निकाह न करता हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. या लग्नानंतर सोशल मीडियावर ‘लव्ह जिहाद’च्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर मोनालिसाने पत्रकार परिषद घेऊन या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
“मी माझा धर्म बदलला नाही”; मोनालिसाचे स्पष्टीकरण
पत्रकार परिषदेत बोलताना मोनालिसा म्हणाली, “आम्ही हिंदू धर्माच्या रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. फरमान माझ्याशी लग्न करण्यास तयार नव्हता, पण मीच त्याच्यावर जबरदस्ती केली. माझे आई-वडील माझे लग्न मावशीच्या मुलाशी लावून देत होते, पण तो मला भावासारखा वाटत असल्याने मी लग्नास नकार दिला.” तिने पुढे स्पष्ट केले की, तिने आपला धर्म बदललेला नाही आणि जे लोक याला ‘लव्ह जिहाद’ म्हणत आहेत, त्यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. तिचे वडील लग्नाला आले होते, पण ते काहीसे नाराज असल्याचेही तिने मान्य केले.
“आमच्यासाठी सर्व धर्म सारखेच”; अभिनेता फरमानची प्रतिक्रिया
मोनालिसाचा पती फरमान, जो दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करतो, त्यानेही आपली भूमिका मांडली. तो म्हणाला, “आम्ही कलाकार आहोत आणि आमच्यासाठी सर्व धर्म सारखेच आहेत. मोनालिसा हिंदू आहे आणि तिची इच्छा होती तसं आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं. मला फक्त तिचा आनंद हवा आहे. आम्ही दोघांनीही एकमेकांचे धर्म बदललेले नाहीत.”
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: Monalisa Bhosle, the viral 'Rudraksha Girl' of the 2025 Maha Kumbh Mela, has married her boyfriend Furman Khan Monalisa Bhosle says, "…I married by following the traditions of the Hindu religion…This is not love jihad…I consider all… https://t.co/qNIMoXJDot pic.twitter.com/NuSUIwf0d4 — ANI (@ANI) March 12, 2026
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचा गंभीर आरोप
मोनालिसाच्या या निर्णयामुळे तिला चित्रपटसृष्टीत आणणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा मात्र प्रचंड संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त करताना म्हटले की, “ही बंडखोरी नाही, तर ‘लव्ह जिहाद’ आहे. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत वाईट दिवस आहे.” महाकुंभात व्हायरल झाल्यानंतर सनोज यांनीच तिला अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली होती. मोनालिसा या षडयंत्राची बळी पडली असून यात तिचा मॅनेजरही सामील असल्याचा खळबळजनक आरोप सनोज मिश्रा यांनी केला आहे.