Stock Market Crash: एक घोषणा आणि शेअर मार्केट गडगडला! सेन्सेक्स 2,400 अंकांनी कोसळला तर निफ्टी…

अर्थमंत्र्यांनी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा करताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. यामुळे दुपारी 12:30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 2,400 पेक्षा जास्त अंकांनी घसरला.

Stock Market Crash: एक घोषणा आणि शेअर मार्केट गडगडला! सेन्सेक्स 2,400 अंकांनी कोसळला तर निफ्टी…

Stock Market Crash:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला 2026 चा अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी मोठा धक्का ठरला आहे. अर्थमंत्र्यांनी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा करताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. यामुळे दुपारी 12:30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 2,400 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 निर्देशांकातही 2 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली.

STT मध्ये वाढ आणि डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग महागले
बाजारातील या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) वरील कर वाढ हे आहे. अर्थमंत्र्यांनी फ्युचर्सवरील STT 0.05 टक्क्यांनी आणि ऑप्शन्सवरील कर 0.15 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंगचा खर्च वाढणार असून, सट्टेबाजीला आळा बसेल असा सरकारचा कयास आहे. याव्यतिरिक्त, आता शेअर बायबॅक (Buyback) मधून मिळणाऱ्या रकमेवरही शेअरहोल्डर्सना भांडवली नफा कर (Capital Gains Tax) भरावा लागणार आहे.

परदेशी गुंतवणूकदारांवरील कराचा बोजा
या कर वाढीचा मोठा फटका परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांना बसण्याची शक्यता आहे. हे गुंतवणूकदार भारतीय डेरिव्हेटिव्ह्ज बाजारात अत्यंत सक्रिय असून अल्गोरिथमिक ट्रेडिंगचा वापर करतात. परदेशी गुंतवणूकदार आधीच दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5 टक्के आणि अल्पकालीन भांडवली नफ्यावर 20 टक्के कर भरत आहेत. आता STT मधील वाढीमुळे त्यांच्यावरील कराचा भार आणखी वाढणार असून, रुपयाचे घसरते मूल्य त्यांच्या परताव्यावर परिणाम करू शकते.

हेही वाचा – Stock Market on Budget Day: शेअर बाजार सुरू पण गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी; काय आहे हा सेटलमेंट हॉलिडे?

सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल
बाजार कोसळला असला तरी, तज्ज्ञांच्या मते हा परिणाम अल्पकालीन असू शकतो. जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांच्या मते, ही वाढ केवळ F&O ((फ्युचर्स अँड ऑप्शन्स) ट्रेडवर लागू आहे, ज्याचा दीर्घकालीन FPI गुंतवणुकीवर थेट परिणाम होणार नाही. SEBI च्या अहवालानुसार, 92 टक्के किरकोळ व्यापारी F&O मध्ये पैसे गमावत आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number