Offline UPI Payment: आता इंटरनेटशिवाय होणार UPI पेमेंट! NPCI च्या नव्या ‘Tap-to-Pay’ तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक सोपे

या सुविधेचा सुरक्षित लाभ देण्यासाठी PoS मशीन उत्पादक कंपन्यांना थेट NPCI कडून अधिकृत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.

Offline UPI Payment: आता इंटरनेटशिवाय होणार UPI पेमेंट! NPCI च्या नव्या ‘Tap-to-Pay’ तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक सोपे

Offline UPI Payment: आजच्या आधुनिक काळात शालेय फी भरण्यापासून ते अगदी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी यूपीआय (UPI) द्वारे डिजिटल पेमेंट केले जाते. ऑनलाईन पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे लोक आता आपल्याजवळ रोख रक्कम (Cash) ठेवणे टाळतात. अशा डिजिटल युगात यूपीआय वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ऑनलाईन व्यवहार करताना तुम्हाला इंटरनेटचा कोणताही अडथळा किंवा नेटवर्कची चिंता भासणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि पेमेंट प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यासाठी 'Tap-to-Pay' ही नवी प्रगत सुविधा लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे.

NFC तंत्रज्ञान आणि 2000 रुपयांपर्यंतचे व्यवहार
ही नवी सुविधा मुख्यत्वे एनएफसी (NFC – Near Field Communication) या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी युजर्सना मोबाईलमध्ये इंटरनेट चालू असताना आपल्या UPI Lite वॉलेटमध्ये आधीच पैसे जमा करून ठेवावे लागतील. त्यानंतर नेटवर्क नसतानाही नागरिक PoS (Point of Sale) मशीनवर आपला मोबाईल टॅप करून अवघ्या काही सेकंदांत 2000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकतील. विशेष म्हणजे, या नव्या पद्धतीने व्यवहार करताना युजर्सना कोणताही UPI PIN प्रविष्ट करण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा – मोबाईलनंतर आता घरातही ChatGPT! OpenAI आणणार स्क्रीनशिवाय AI डिव्हाइस; काय असेल खास?

नेटवर्क नसलेल्या ठिकाणी उपयुक्त ठरणारी यंत्रणा
इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या किंवा अजिबात नेटवर्क नसलेल्या भागांमध्ये ही सेवा नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. विशेषतः विमान प्रवास करताना, भुयारी मेट्रो नेटवर्कमध्ये, दुर्गम ग्रामीण भागांत आणि डोंगराळ क्षेत्रांत यामुळे डिजिटल पेमेंट करणे सहज शक्य होणार आहे. ऑफलाईन पेमेंट करताना संबंधित PoS मशीन सर्व व्यवहारांची माहिती स्वतःमध्ये पूर्णपणे सुरक्षित ठेवेल आणि डिव्हाईस इंटरनेटच्या संपर्कात येताच ती तपासणीसाठी पुढे पाठवली जाईल. या सुविधेचा सुरक्षित लाभ देण्यासाठी PoS मशीन उत्पादक कंपन्यांना थेट NPCI कडून अधिकृत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.

बँका आणि लोकप्रिय ॲप्सची तयारी
सध्याच्या घडीला देशातील प्रमुख बँकांसोबतच Google Pay, PhonePe आणि BHIM यांसारखे आघाडीचे यूपीआय ॲप्स हे नवे फिचर आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडण्यासाठी वेगाने काम करत आहेत. ऑफलाईन डिजिटल पेमेंटच्या या सुविधेमुळे येत्या काळात देशातील कॅशलेस व्यवहारांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Live Train Tracking : ट्रेन लेट झाली तरी टेन्शन नाही! घरबसल्या 'या' दोन अधिकृत पद्धतींनी मिळवा अचूक अपडेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number