Jantar Mantar Protest: पंतप्रधानांविरोधात अश्लील वक्तव्य भोवलं; दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर ‘त्या’ अल्पवयीन तरुणीचा माफीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीचा माफीनामा समोर आला आहे.

Jantar Mantar Protest: पंतप्रधानांविरोधात अश्लील वक्तव्य भोवलं; दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर ‘त्या’ अल्पवयीन तरुणीचा माफीनामा

Jantar Mantar Protest:  जंतर-मंतर येथे सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीचा माफीनामा समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी 'झिरो एफआयआर' (Zero FIR) नोंदवून तपास सुरू करताच, तिने सोशल मीडियावर हात जोडून देशाची माफी मागणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

इतरांच्या चिथावणीमुळे घडली चूक – तरुणीचा दावा
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीने स्वतःचे वय 15 वर्षे असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले आहे. तिने नमूद केले की, ती तिच्या मैत्रिणीसोबत कनॉट प्लेस भागात गेली असताना तेथील आंदोलकांच्या प्रभावाखाली आली. आंदोलकांनी दिलेल्या चिथावणीमुळे आणि दबावामुळे आपल्याकडून ती अक्षम्य चूक घडली. "मी जे बोलले ते अत्यंत चुकीचे होते. ही माझी पहिली आणि शेवटची चूक असून मला संपूर्ण देशाची मान खाली घालून माफी मागायची आहे," असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पोलीस तपास आणि वयाबाबतची विसंगती
दरम्यान, या तरुणीने केलेल्या दाव्यांवर आणि तिने दिलेल्या वयावर पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिच्या दाव्यात विसंगती आढळून आली आहे. गाझियाबादच्या वकील स्मृती सिंग यांच्या तक्रारीवरून नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात मूळ एफआयआर दाखल करण्यात आला होता. तरुणीचे फरिदाबाद आणि नोएडाच्या सेक्टर 150 मधील 'लोटस झिंग' सोसायटीमध्ये निवासस्थान असल्याचे समजते. घटनेनंतर ती काही काळ गायब होती.

दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'कडे तपास वर्ग
घटनेचे अधिकारक्षेत्र दिल्लीत येत असल्याने हा गुन्हा बीएनएसच्या (BNS) कलम 352, 353(1) आणि 356(1) अंतर्गत वर्ग करून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे सोपवण्यात आला आहे. याशिवाय सोशल मीडियावरून तो आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यासाठी 'X' (ट्विटर) ला नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा – Anti Paper Leak Law: पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही; प्रश्नपत्रिका फुटीविरोधी सुधारित कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे औदार्य आणि शांततेचे आवाहन
या संपूर्ण वादावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आणि दिवंगत आईविरुद्ध वापरण्यात आलेली भाषा हा एक "सांस्कृतिक धक्का" असल्याचे सांगतानाच, त्यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. पंतप्रधानांनी या प्रकरणी दंडात्मक कारवाई किंवा न्यायालयीन खटले न चालवण्याचे आवाहन केले आहे. "तरुणांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांचे स्वागत केले पाहिजे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुसरीकडे, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी आणि संस्थापकांनी या कारवाईवर आक्षेप घेत, अशा प्रकरणांमध्ये फौजदारीऐवजी दिवाणी मानहानीचे खटले चालवले जावेत असा युक्तिवाद केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number