NTA Restructure: NTA ची होणार पुनर्रचना; 47 अधिकारी बडतर्फ, संपूर्ण रचनेमध्ये मोठे फेरबदल

या मोहिमेअंतर्गत संस्थेतील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, आगामी काळात आणखी काही जबाबदार घटकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.<br/>

NTA Restructure: NTA ची होणार पुनर्रचना; 47 अधिकारी बडतर्फ, संपूर्ण रचनेमध्ये मोठे फेरबदल

NTA Restructure: नॅशनल टेस्टिंग एजन्सी'च्या (NTA) कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत संस्थेतील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, आगामी काळात आणखी काही जबाबदार घटकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण संस्थात्मक संरचनेत मोठे बदल
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NTA च्या एकूणच काम करण्याच्या पद्धतीत मुळापासून सुधारणा घडवून आणली जात आहे. केवळ अधिकारी बदलण्यापुरती ही कारवाई सीमित नसून, संपूर्ण यंत्रणेची पुनर्रचना केली जाणार आहे. परीक्षा पद्धतीमधील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करण्यासाठी या संस्थेचे नवे स्वरूप लवकरात लवकर समोर आणले जाईल.

बाह्य सेवांवर लगाम आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारशी
येत्या महिनाभरात या सर्व फेरबदलांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः, परीक्षा आयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या 'आउटसोर्सिंग' सेवांच्या नियमांमध्ये कडक सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपायांच्या आधारेच ही नवी नियमावली तयार केली जात आहे.

हेही वाचा – Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार? 8 वाजता मोदी सरकार करणार मोठी घोषणा

'लीक-प्रूफ' यंत्रणेद्वारे गुणवत्तेचे रक्षण
NEET सह देशातील अनेक महत्त्वाच्या व राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांचे आयोजन NTA द्वारे केले जाते. या परीक्षांची गुप्तता अबाधित राहावी आणि कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फूट किंवा गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पूर्णपणे 'लीक-प्रूफ' सुरक्षा यंत्रणा उभारण्यावर सरकारचा मुख्य भर आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number