NEET Exam Protest: NTA मुख्यालयासमोर NSUI चे जोरदार आंदोलन; आवारात शिरण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलांशी झटापट

संतप्त आंदोलकांनी NTA च्या मुख्य इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला असता, तिथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांशी त्यांची मोठी झटापट झाली.<br/>

NEET Exam Protest: NTA मुख्यालयासमोर NSUI चे जोरदार आंदोलन; आवारात शिरण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलांशी झटापट

NEET Exam Protest: ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण आता चांगलेच तापले असून, शनिवारी काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘NSUI’ ने दिल्लीतील ओखला येथील ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) च्या मुख्यालयाबाहेर उग्र आंदोलन केले. ही परीक्षा त्वरित रद्द करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी संतप्त आंदोलकांनी NTA च्या मुख्य इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला असता, तिथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांशी त्यांची मोठी झटापट झाली. यावेळी एका विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं, ‘आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही एवढ्या गरीबीतून शिकतो, परंतु, शिक्षण  व्यवस्थेतील या घटनेमुळे आमचं मोठ नुकसान होत आहे. आम्ही आता रस्त्यावर उतरलो असून आमच्याशी बोलायला अद्याप कोणी मंत्री आला नाही. मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात. त्यामुळे त्यांना येथील व्यवस्थेशी काही घेणेदेणे नाही. परंतु, आम्हाला फक्त आणि फक्त न्याय हवा आहे.’ 

दोषींवर कारवाई आणि महासंचालकांच्या राजीनाम्याची मागणी
NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी NTA च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. परीक्षा प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या अनियमिततांमुळे लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात सापडले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि NTA च्या महासंचालकांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्यात यावे, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा – NEET UG Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; लातूरच्या केमिस्ट्री प्रोफेसरने पुण्यातून हलवले पेपरफुटीचे सूत्र, CBI ने आवळल्या मुसक्या

बॅरिकेड्सवरून चढून जाण्याचा प्रयत्न आणि पोलिसांशी संघर्ष
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांनी मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी या कार्यकर्त्यांना रोखून धरले, ज्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी “NTA वर बंदी घाला”, “शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्या” आणि “नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

आंदोलकांची धरपकड आणि पुढील पवित्रा
बराच वेळ चाललेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलांनी कार्यकर्त्यांना बळजबरीने बसमध्ये चढवून घटनास्थळावरून नेले. ताब्यात घेत असतानाही विद्यार्थ्यांचा घोषणाबाजीचा जोर कमी झाला नव्हता. पेपरफुटीचा मुद्दा जोपर्यंत निकाली निघत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा NSUI कडून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number