Railway Luggage Rules: आता ट्रेनमध्ये विमानासारखे नियम! AC कोचमध्ये 70 किलोपर्यंत मोफत, त्यानंतर भरावे लागणार ‘इतके’ शुल्क

एसी कोच आणि चेअर कारमध्ये नियम अधिक कडक आहेत. या वर्गातील प्रवाशांना फक्त 40 किलो मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे.

Railway Luggage Rules: आता ट्रेनमध्ये विमानासारखे नियम! AC कोचमध्ये 70 किलोपर्यंत मोफत, त्यानंतर भरावे लागणार ‘इतके’ शुल्क

Railway Luggage Rules: आता रेल्वे प्रवाशांना विमानप्रमाणेच सामान नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रेल्वेने स्पष्ट केले आहे की, निर्धारित सामान मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. ही माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. रेल्वे नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाला प्रवास वर्गानुसार निश्चित प्रमाणात मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे. द्वितीय श्रेणीतील प्रवाशांना 35 किलोपर्यंत मोफत सामान, तर स्लीपर वर्गासाठी 40 किलो मोफत सामान वाहून नेता येते. जर प्रवाशांना अधिक सामान नेणे आवश्यक असेल, तर शुल्क भरून 70 ते 80 किलोपर्यंत सामान वाहून नेणे शक्य आहे.

हेही वाचा – Home Loan Repayment: गृहकर्जाच्या ओझ्यातून व्हा लवकर मुक्त; व्याजावर खर्च होणारे पैसे वाचवण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

नियमांची काटेकोर अंमलबजावणी 

एसी कोच आणि चेअर कारमध्ये नियम अधिक कडक आहेत. या वर्गातील प्रवाशांना फक्त 40 किलो मोफत सामान वाहून नेण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त वजन वाहिल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. रेल्वेचे म्हणणे आहे की जड सामान केवळ प्रवाशांच्या आरामात अडथळा आणत नाही, तर सुरक्षा आणि स्वच्छतेसंबंधीही समस्या निर्माण करते. कोचमध्ये जड सामानामुळे हालचाल कठीण होते आणि अपघातांचा धोका वाढतो, त्यामुळे आता या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा – CNG-PNG Gas Price Cut: 1 जानेवारीपासून CNG, घरगुती PNG गॅस स्वस्त होणार; ग्राहकांना आता प्रति युनिट 'इतके' पैसे मोजावे लागणार

दरम्यान, प्रवाश्यांना सल्ला देण्यात आला आहे की, ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी आपले सामान निश्चित मर्यादेत आहे की नाही हे तपासावे. अधिक सामान असल्यास आगाऊ बुकिंग करणे किंवा अतिरिक्त शुल्क भरायला तयार राहावे. यामुळे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित राहील. रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांसाठी महत्वाचा ठरणार आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number