Deool Band 2 Teaser: आता परीक्षा देवाची! ‘देऊळ बंद 2’चा टीझर रिलीज; पाहा व्हिडीओ

स्वामी भक्तांचे लक्ष लागून असलेला ‘देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाचा टीझर स्वामींच्या चरणी अक्कलकोटमध्ये दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.

Deool Band 2 Teaser: आता परीक्षा देवाची! ‘देऊळ बंद 2’चा टीझर रिलीज; पाहा व्हिडीओ

Deool Band 2 Teaser: तब्बल 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, स्वामी भक्तांचे लक्ष लागून असलेला ‘देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाचा टीझर स्वामींच्या चरणी अक्कलकोटमध्ये दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रवीण तरडे यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. टीझर प्रदर्शनानंतर बोलताना अभिनेत्री स्नेहल तरडे यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत आणि त्यांनी हा चित्रपट सर्व कष्टकरी महिलांना समर्पित केला.

स्वामींच्या साक्षीने टीझरचा अनावरण सोहळा
2015 मध्ये आलेल्या ‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता त्याचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला. यावेळी आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

स्नेहल तरडे का झाल्या भावूक?
टीझर लॉन्चच्या वेळी बोलताना स्नेहल तरडे अतिशय भावनिक झाल्या होत्या. त्यांनी चित्रपटाचे महत्त्व सांगताना म्हटले, “हा चित्रपट आम्ही अशा स्त्रियांना समर्पित करत आहोत, ज्या आपल्या कुटुंबासाठी स्वतःचे अस्तित्व विसरून कष्ट करतात. कोणाकडूनही कौतुकाची किंवा बदल्याची अपेक्षा न ठेवता त्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी लढत असतात. अशा प्रत्येक संघर्षशील माऊलीला आमचा हा चित्रपट अर्पण आहे. स्वामींनी आम्हाला ही प्रेरणा दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.”

हेही वाचा – Chakda Xpress Movie : अनुष्का शर्माची ‘चकदा एक्सप्रेस’ पडद्यावर कधी येणार? चित्रपट पूर्ण होऊनही झाला नाही रिलीज ; अभिनेत्याने केला मोठा खुलासा

काय आहे ‘देऊळ बंद 2’चे वेगळेपण?
पहिल्या भागात स्वामींनी एका शास्त्रज्ञाच्या लक्झरी गाडीतून प्रवास केला होता, तर यावेळी स्वामी एका गरीब महिलेच्या साध्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत. एका सामान्य कुटुंबाची असामान्य श्रद्धा आणि संघर्षाची गाथा या चित्रपटात पाहायला मिळेल. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. टीझर लॉन्चच्या या सोहळ्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number