UPI One World: आता परदेशी पर्यटकांना करणार येणार ‘स्कॅन आणि पे’; NPCI कडून ‘UPI One World’ सेवा लाँच

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट2026' च्या पार्श्वभूमीवर, NPCI ने 40 हून अधिक देशांतील पाहुण्यांसाठी 'UPI One World' ही विशेष वॉलेट सेवा सुरू केली आहे.

UPI One World: आता परदेशी पर्यटकांना करणार येणार ‘स्कॅन आणि पे’; NPCI कडून ‘UPI One World’ सेवा लाँच

UPI One World: भारताची डिजिटल पेमेंट यंत्रणा असलेल्या UPI ने आता जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट2026' च्या पार्श्वभूमीवर, NPCI ने 40 हून अधिक देशांतील पाहुण्यांसाठी 'UPI One World' ही विशेष वॉलेट सेवा सुरू केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता परदेशी पर्यटक आणि प्रतिनिधींना भारतात पेमेंट करण्यासाठी भारतीय मोबाईल नंबर किंवा स्थानिक बँक खात्याची कोणतीही गरज भासणार नाही.

काय आहे 'UPI One World' आणि त्याचे फायदे?
'UPI One World' हे एक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) वॉलेट आहे, जे प्रामुख्याने परदेशी प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी पर्यटक त्यांच्या स्वतःच्या देशाचा पासपोर्ट आणि व्हिसा वापरून यावर नोंदणी करू शकतात. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याची किंवा फॉरेक्स कार्डवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. पर्यटक त्यांचे परदेशी चलन किंवा कार्ड वापरून हे वॉलेट थेट 'टॉप अप' करू शकतात आणि भारतातील कोणत्याही व्यापाऱ्याचा QR कोड स्कॅन करून सहज पेमेंट करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया आणि वापराचे नियम
NPCI ने ही सेवा अत्यंत सुलभ केली असून, परदेशी पाहुण्यांसाठी ठिकठिकाणी टचपॉइंट्स उपलब्ध करून दिले आहेत. ही सुविधा नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हॉल क्रमांक 14 आणि भारत मंडपम येथील NPCI पॅव्हेलियनमध्ये उपलब्ध आहे. पाहुण्यांना यासाठी 'CheqUPI' नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. आपली मूलभूत माहिती भरून आणि सेल्फी पडताळणी पूर्ण करून ते आपला UPI पिन सेट करू शकतात. या वॉलेटची मर्यादा एका वेळी 25 हजारांपर्यंत असून, मासिक मर्यादा 50 हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सहल संपल्यानंतर वॉलेटमध्ये उरलेली रक्कम पर्यटक त्यांच्या मूळ परदेशी बँक खात्यात परत मिळवू शकतात.

हेही वाचा – ChatGPT In India: भारतात AI चा डंका, दर आठवड्याला 100 दशलक्ष भारतीयांकडून ChatGPT चा वापर; सॅम ऑल्टमन यांचा मोठा खुलासा

जागतिक कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय
NPCI च्या ग्रोथ विभागाच्या कार्यकारी संचालक सोहिनी राजोला यांच्या मते, हा उपक्रम भारताच्या 'मेड इन इंडिया' डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा (DPI) अनुभव जगाला देण्यासाठी आहे. परदेशी पर्यटकांना मिळणारा हा डिजिटल अनुभव भविष्यात 'क्रॉस-बॉर्डर पेमेंट' किती सोपे आणि सुरक्षित असू शकते, याचे उत्तम उदाहरण ठरेल. या उपक्रमामुळे जागतिक पर्यटनाला आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number