Nishant Kumar JDU Entry: बिहारच्या राजकारणात ‘निशांत’ पर्व! नितीश कुमारांच्या पुत्राची जेडीयूत एन्ट्री; थेट उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

'जनता दल युनायटेड'च्या (JDU) कोअर टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून, आगामी काळात त्यांच्या खांद्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे

Nishant Kumar JDU Entry: बिहारच्या राजकारणात ‘निशांत’ पर्व! नितीश कुमारांच्या पुत्राची जेडीयूत एन्ट्री; थेट उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

Nishant Kumar JDU Entry:  बिहारच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.  नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी अखेर सक्रिय राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. 'जनता दल युनायटेड'च्या (JDU) कोअर टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून, आगामी काळात त्यांच्या खांद्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे बिहारच्या सत्तासंघर्षाला आता नवी दिशा मिळाली आहे.

पक्ष कार्यालयात जंगी स्वागत; मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेत
निशांत कुमार यांच्या पक्षप्रवेशावेळी जेडीयू कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह दाखवत मोठी गर्दी केली होती. "युवकांचा विचार, दृढ निश्चय" अशा घोषणांनी संपूर्ण पक्ष कार्यालय दुमदुमून गेले होते. या ऐतिहासिक क्षणी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह उपस्थित होते. मात्र, स्वतः नितीश कुमार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या प्रवेशानंतर बोलताना निशांत कुमार म्हणाले, "माझ्या वडिलांनी गेल्या 20 वर्षांत बिहारसाठी जे कार्य केले, त्यावर संपूर्ण राज्याला अभिमान आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ करून दाखवेन."

कोण आहेत निशांत कुमार?
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत निशांत कुमार यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी रांची येथील 'बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. ते अत्यंत शांत, संयमी आणि दूरदर्शी स्वभावाचे मानले जातात. जून 2025 पासूनच त्यांना राजकारणात आणण्यासाठी पक्षांतर्गत मागणी जोर धरत होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा – No Confidence Motion: संसदेत सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने; लोकसभा अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर सोमवारी चर्चा आणि मतदान

10 एप्रिलनंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ?
जेडीयू आमदार हरिनारायण सिंह यांनी केलेल्या एका दाव्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, आगामी काळात खालील बदल होऊ शकतात. नितीश कुमार 10 एप्रिलनंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीद्वारे निशांत कुमार विधीमंडळात प्रवेश करतील. वडिलांच्या राजीनाम्यानंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यावर पक्षाचे एकमत झाले आहे. नितीश कुमार यांनी नुकताच राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आता बिहारची सत्ता निशांत कुमार यांच्याकडे सोपवून नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number