Delhi Blast Update : NIA करणार दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

गृह मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Delhi Blast Update : NIA करणार दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Delhi Blast Update: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तपास यंत्रणा सध्या घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून स्फोटाच्या सूत्रधारांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लाल किल्ल्याजवळील कार स्फोटाने खळबळ

लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ पार्क केलेल्या हुंडाई i20 कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार, कार चालवणारा व्यक्ती पुलवामाचा रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचा पहिला फोटो समोर आला असून त्याचा फरिदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मॉड्यूलकडून यापूर्वी मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा – Delhi Car Blast: कट उघड झाल्याने केला आत्मघातकी हल्ला; फरिदाबाद मॉड्यूलबाबत मोठा खुलासा

दिल्ली हाय अलर्टवर

स्फोटानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके, मेट्रो स्टेशन आणि बस टर्मिनल्सवर उच्च सतर्कता पाळली जात आहे. तपास पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले असून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा – Delhi Blast Update : दिल्लीतील स्फोटापूर्वी पार्किंगमध्ये दोन तास उभी होती कार; पोलीस घेत आहेत या संशयिताचा शोध

UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा’ (UAPA) आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, हा स्फोट एक नियोजित दहशतवादी कटाचा भाग असू शकतो. एनआयए आता या संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी स्वतंत्र तपास सुरू करणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number