World Top-10 Cities: जागतिक दर्जाच्या शहरांची नवी यादी जाहीर; लंडन पुन्हा नंबर वन, तर भारतातील ‘हे’ शहर ठरले अव्वल

रेझोनन्स कन्सल्टन्सी आणि इप्सॉस यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून हे जागतिक रँकिंग ठरवण्यात आले. रहिवासी, पर्यटक आणि गुंतवणूकदार तिन्ही घटकांच्या दृष्टीने लंडनने सर्वोच्च कामगिरी केली.

World Top-10 Cities: जागतिक दर्जाच्या शहरांची नवी यादी जाहीर; लंडन पुन्हा नंबर वन, तर भारतातील ‘हे’ शहर ठरले अव्वल

World Top-10 Cities: जगभरातील रहिवाशांना सर्वोत्तम सुविधा, रोजगाराच्या संधी आणि उच्च दर्जाची जीवनशैली उपलब्ध करून देणारी शहरे कोणती? याचे उत्तर देणारी 'वर्ल्ड्स बेस्ट सिटीज 2026' ही प्रतिष्ठित यादी यंदाही जाहीर झाली आहे. या यादीनुसार लंडनने सलग अकराव्यांदा जागतिक क्रमांक 1 चे मानकरी ठरत सर्वांना मागे टाकले आहे.

सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीत लंडन पुन्हा अव्वल

रेझोनन्स कन्सल्टन्सी आणि इप्सॉस यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून हे जागतिक रँकिंग ठरवण्यात आले. रहिवासी, पर्यटक आणि गुंतवणूकदार तिन्ही घटकांच्या दृष्टीने लंडनने सर्वोच्च कामगिरी केली. राहणीमान, प्रेमक्षमता आणि आर्थिक प्रगती या तीन मुख्य स्तंभांवर लंडन जवळपास सर्व विभागात अव्वल ठरले.

हेही वाचा – Pakistan : पाकिस्तानच्या नेत्याचं संतापजनक वक्तव्य; म्हणाला, 'आम्ही काही दिवसांतच आतमध्ये घुसून…'

2025-26 साठी जगातील टॉप 10 शहरे

लंडन
न्यू यॉर्क 
पॅरिस
टोकियो
माद्रिद
सिंगापूर
रोम
दुबई  
बर्लिन
बार्सिलोना

युरोपियन शहरांचे यंदाही वर्चस्व टिकून राहिले असून, टॉप 10 मध्ये केवळ दोनच आशियाई शहरे टोकियो आणि सिंगापूर स्थान मिळवू शकली.

भारताचे कोणते शहर सर्वात अव्वल?

भारताच्या शहरांनी यंदा चांगली झेप घेतली असून, बंगळुरूने देशात अव्वल ठरत जागतिक क्रमवारीत 29 वा क्रमांक पटकावला आहे. देशाची "टेक कॅपिटल" म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरूची स्टार्टअप इकोसिस्टम, आयटी इंडस्ट्री आणि जागतिक कनेक्टिव्हिटीला उच्च गुण मिळाले.

हेही वाचा – Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा बालिशपणा पुन्हा समोर; घेतलेला कठोर निर्णय शांतपणे मागे घेतला

इतर भारतीय शहरे 

मुंबई – 40 वा क्रमांक
दिल्ली – 54 वा क्रमांक
हैदराबाद – 82 वा क्रमांक

हेही वाचा – India Security Concerns: मुस्लिम राष्ट्रांनी भारताविरुद्ध कुरघोडी! तुर्की–कतार आणि पाकिस्तानची भारतविरोधी एकजूट?

रँकिंग कसे निश्चित करण्यात आले?

या अहवालात जगभरातील 270 हून अधिक मेगासिटीजचे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी शिक्षणाची गुणवत्ता, सांस्कृतिक वैविध्य, कनेक्टिव्हिटी आणि ट्रान्सपोर्ट, नाईटलाइफ, स्वच्छता व सुरक्षितता, आरोग्यसेवा, रोजगार आणि स्टार्टअप संधी, उत्पन्न आणि आर्थिक बळकटी या सर्व घटकांच्या आधारे प्रत्येक शहराला ‘प्लेस पॉवर स्कोअर’ देण्यात आले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number