Negative Impact of Rahu Chandra Yuti : जगभरात सध्या राजकीय आणि युद्धाचे वातावरण तापलेले असतानाच, खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय घडामोडींनी चिंतेत भर घातली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 40 दिवसांच्या संघर्षानंतर 14 ते 15 दिवसांचा युद्धविराम झाला असला, तरी आखाती देशांतील तणाव कायम आहे. याच दरम्यान, 13 एप्रिल 2026 रोजी अवकाशात एक अशुभ 'ग्रहण योग' निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाला अत्यंत नकारात्मक मानले जाते, कारण त्याचा थेट परिणाम मानवी स्वभावावर होतो. तसेच, देशातील आणि जागतिक घडामोडींवरही होत असतो.
कसा तयार होतोय हा 'ग्रहण योग'?
ज्योतिषीय गणनेनुसार, चंद्र हा दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलत असतो. सध्या चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत असून, 13 एप्रिल 2026 रोजी तो कुंभ राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, कुंभ राशीत आधीपासूनच राहू हा क्रूर ग्रह ठाण मांडून बसला आहे. जेव्हा चंद्र आणि राहूची युती होते, तेव्हा त्याला 'ग्रहण योग' म्हटले जाते. हा योग मानसिक अस्वस्थता, गोंधळ आणि अनिश्चिततेची स्थिती निर्माण करतो. या काळात खालील 3 राशींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे:
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ थोडा कठीण जाऊ शकतो. या राशीचा स्वामी चंद्र असल्याने ग्रहण योगाचा सर्वाधिक परिणाम मानसिक आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. विनाकारण भीती वाटणे किंवा लहान गोष्टींवरून चिडचिड होणे असे प्रकार घडू शकतात. कामाच्या ठिकाणी स्वतःची जबाबदारी इतरांवर टाकू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करणे सध्या टाळलेलेच बरे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ संयमाची मोठी परीक्षा घेणारा ठरेल. कामात मन न लागणे किंवा एकाग्रता भंग पावणे यामुळे प्रलंबित कामांचा डोंगर वाढू शकतो. कोणाशीही संवाद साधताना आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा, कारण साध्या शब्दाचा चुकीचा अर्थ निघून मोठे वाद उद्भवू शकतात. नवीन कोणतेही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये चढ-उतार येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत किरकोळ कारणावरून मतभेद होऊ शकतात, जे पुढे गंभीर रूप घेऊ शकतात. व्यावसायिक क्षेत्रात नवीन स्पर्धकांमुळे मानसिक दडपण येऊ शकते. स्वतःला एकटे पाडण्यापेक्षा विश्वासू मित्रांशी बोलणे हितकारक ठरेल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
काय कराल उपाय?
या अशुभ योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा (Meditation) करणे प्रभावी ठरते. तसेच, महादेवाची उपासना केल्याने चंद्राचे दोष कमी होण्यास मदत होते. संकटाच्या काळात घाईने निर्णय न घेता शांत राहणे हाच सर्वात मोठा उपाय आहे.
हेही वाचा – Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीऐवजी खरेदी करा 'या' 4 वस्तू; घरात नांदेल सुख-समृद्धी
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)