NEET UG 2026 Re-Exam Admit Card : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) NEET UG 2026 च्या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) आता NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना ही परीक्षा द्यायची आहे, ते आपल्या लॉगिन डिटेल्सचा वापर करून आपले हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र डाऊनलोड करावे आणि संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र खालील स्टेप्स फॉलो करून थेट लिंकद्वारे डाऊनलोड करता येईल:
– सर्वप्रथम NTA च्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– होमपेजवर उपलब्ध असलेल्या NEET UG Re-Exam 2026 Admit Card या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक (Application Number), जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन अचूक भरा.
– माहिती सबमिट केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
– प्रवेशपत्रावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआऊट काढून घ्या.
हॉल तिकीटवरील महत्त्वाची माहिती आणि पडताळणी
NEET UG च्या या प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, रोल नंबर, जन्मतारीख यांसारख्या वैयक्तिक तपशिलांसह परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता दिलेला असतो. उमेदवारांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून त्यावर 'रिपोर्टिंग टाईम' देखील स्पष्टपणे नमूद केला आहे. परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी प्रवेशपत्रावरील सूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. याशिवाय, रिफंड प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपल्या बँक खात्याची माहिती तपासून घ्यावी, असेही NTA ने स्पष्ट केले आहे.
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आणि वेळेचे बंधन
परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी वेळेचे पालन करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्राचे दरवाजे सकाळी 11:00 वाजता उघडले जातील, तर दुपारी 1:30 वाजता प्रवेशद्वार पूर्णपणे बंद केले जाईल. या निश्चित वेळेनंतर येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अंतिम पडताळणी व प्रवेश दुपारी 1:40 पर्यंतच असेल. मुख्य परीक्षा दुपारी 2:00 ते सायंकाळी 5:15 या वेळेत पार पडेल.
NTA कडून परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल
विद्यार्थ्यांच्या हितासाठी NTA ने यंदाच्या परीक्षा प्रक्रियेत काही मोठे बदल केले आहेत. यानुसार परीक्षेचा एकूण कालावधी वाढवून आता 195 मिनिटे करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मागील वर्षांपेक्षा अधिक वेळ मिळणार आहे. याचसोबत, विद्यार्थ्यांना कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेत एकूण 4 पाने दिली जातील, ज्यामध्ये 2 पाने सुरुवातीला आणि 2 पाने शेवटच्या भागात उपलब्ध असतील.