JNVST 2026: नवोदय विद्यालयात 6 वीच्या प्रवेशासाठी बिगुल वाजले! जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचा ‘नवा पॅटर्न’

Navodaya Vidyalaya Registration for Class VI : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. देशातील गुणवंत व प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांनी आपल्या आगामी सत्राचा अधिकृत आराखडा जाहीर केला आहे. या अंतर्गत […]

JNVST 2026: नवोदय विद्यालयात 6 वीच्या प्रवेशासाठी बिगुल वाजले! जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचा ‘नवा पॅटर्न’

Navodaya Vidyalaya Registration for Class VI : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. देशातील गुणवंत व प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांनी आपल्या आगामी सत्राचा अधिकृत आराखडा जाहीर केला आहे. या अंतर्गत नवोदय विद्यालय समितीमार्फत 2027 मधील सहावीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी निवड चाचणी (JNVST) प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी लागणारी पात्रता आणि वयोमर्यादा
नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील निकष पूर्ण करावे लागतील:
पात्रता: संबंधित जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील. तसेच उमेदवाराने इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे पूर्ण शैक्षणिक वर्ष मान्यताप्राप्त शाळेतून उत्तीर्ण केलेले असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा: विद्यार्थ्याचा जन्म 01 मे 2015 ते 31 जुलै 2017 या कालावधीत झालेला असावा (दोन्ही दिवस धरून). म्हणजेच 01 मे 2015 पूर्वी जन्मलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही.
अट: एकदा ही प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा ही परीक्षा देता येणार नाही. तसेच विद्यार्थी सध्या ज्या जिल्ह्यात पाचवीत शिकत आहे, त्याच जिल्ह्यासाठी तो अर्ज करू शकतो.

कसे असेल परीक्षेचे स्वरूप आणि तारीख?
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) 28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 01:30 या वेळेत एकाच टप्प्यात घेतली जाईल. 100 गुणांसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 2 तास (120 मिनिटे) दिले जाणार असून, एकूण 80 वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्न विचारले जातील. यात कोणतीही नकारात्मक गुणांकन पद्धत (Negative Marking) नसेल आणि प्रत्येक अचूक उत्तराला 1.25 गुण मिळतील. परीक्षेचे तीन विभाग पुढीलप्रमाणे असतील:
मानसिक क्षमता आणि परिसर अभ्यास (MAT & EVS): 40 प्रश्न (50 गुण – 60 मिनिटे)
अंकगणित (Arithmetic): 20 प्रश्न (25 गुण – 30 मिनिटे)
भाषा चाचणी (Language Test): 20 प्रश्न (25 गुण – 30 मिनिटे)
दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 40 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, कानडी, उर्दू, तेलुगू, गुजराती व बंगाली अशा विविध भाषांमध्ये परीक्षा देण्याची मुभा आहे.

हेही वाचा – ती वारंवार मदत मागत होती.. पण शिक्षिकेला मुळीच पर्वा नव्हती! त्या 9 वर्षीय विद्यार्थीनीचा अंगावर अखरेच्या क्षणातील काटा आणणारा CCTV व्हिडिओ व्हायरल

नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
इच्छुक उमेदवारांना नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मोफत ऑनलाइन नोंदणी करता येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत करण्यासाठी प्रत्येक नवोदय विद्यालयात ‘हेल्पडेस्क’ देखील सुरू करण्यात आला आहे. अर्ज करताना उमेदवारांना खालील कागदपत्रे 10 ते 100 kb च्या जेपीजी (JPG) फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील:
विद्यार्थ्याचा फोटो
पालकांची व विद्यार्थ्याची स्वाक्षरी
आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा (पत्ता पडताळणीसाठी)
नोंद: अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल.

नवोदय विद्यालयांची वैशिष्ट्ये आणि निकाल
नवोदय विद्यालये ही पूर्णपणे निवासी आणि सह-शिक्षण (Co-educational) देणारी सरकारी विद्यालये आहेत, जिथे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश आणि पाठ्यपुस्तके पुरवली जातात. राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी यात ‘मायग्रेशन स्कीम’ (स्थलांतर योजना) राबवली जाते, ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी दुसऱ्या भाषिक राज्यात शिकण्याची संधी मिळते. सध्या देशातील 27 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 665 विद्यालये कार्यरत असून महाराष्ट्रात 33+1 अशी विद्यालये मंजूर आहेत. या प्रवेश परीक्षेचा निकाल मार्च 2027 च्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Customs Duty: स्मार्टफोन ते स्मार्टवॉच… इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात होणार कपात?; सरकारच्या 'या' निर्णयामुळे घसरणार किमती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number