Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील 6 शहीद वीरांची नावे प्रथमच समोर; यादी शेअर

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या भारतीय लष्कराच्या 6 पराक्रमी जवानांची नावे केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृतपणे जगासमोर आणली आहेत.

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील 6 शहीद वीरांची नावे प्रथमच समोर; यादी शेअर

Operation Sindoor: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही धडक मोहीम हाती घेतली होती. या ऐतिहासिक कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या भारतीय लष्कराच्या 6 पराक्रमी जवानांची नावे केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृतपणे जगासमोर आणली आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 निष्पाप नागरिकांना (25 पर्यटक आणि 1 स्थानिक नागरिक) आपला जीव गमवावा लागला होता. या भ्याड हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय संरक्षण दलाने शत्रूच्या हद्दीत घुसून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दणका दिला. या संपूर्ण मोहिमेत देशाचे रक्षण करताना 6 जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले.

हवाई दलाच्या सार्जंटसह लष्कराच्या 5 जवानांचा देशसेवेत सर्वोच्च त्याग
पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावणाऱ्या या विशेष मोहिमेत भारतीय भूदलातील 5 जवान आणि भारतीय हवाई दलातील एका धैर्याने लढणाऱ्या सार्जंटने वीरमरण पत्करले. या साहसी कारवाईत प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर पुत्रांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

सुभेदार मेजर पवन कुमार (मुख्यालय, 10 इन्फंट्री ब्रिगेड)
रायफलमन सुनील कुमार (4 थी बटालियन, जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंट)
लान्स नाईक दिनेश कुमार (5 वी फील्ड रेजिमेंट)
अग्निवीर मूड मुरली नायक (851 वी लाइट रेजिमेंट)
हवालदार सुनील कुमार सिंग (237 वी फील्ड वर्कशॉप)
सार्जंट सुरेंद्र कुमार (39 विंग, भारतीय हवाई दल)

शौर्य पदकांनी सन्मान; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर सुवर्णअक्षरांनी कोरली जाणार नावे
या मोहिमेदरम्यान दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्यासाठी रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर ‘वीर चक्र’ तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर ‘वायू पदक’ जाहीर करून त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला आहे. या 6 ही अमर शहीदांचे स्मरण देशातील भावी पिढ्यांना सदैव राहावे, यासाठी नवी दिल्लीतील इंडिया गेट परिसरातील ‘राष्ट्रीय युद्ध स्मारका’वर (National War Memorial) विशेष ग्रॅनाइटच्या शिळेवर या वीरांची नावे कायमस्वरूपी कोरली जाणार आहेत.

हेही वाचा – Elderly Woman Last Wish : ‘मला माझ्या मायभूमीतच घ्यायचा आहे अखेरचा श्वास’; 94 वर्षीय महिलेने व्यक्त केली शेवटची इच्छा

काय होते ‘ऑपरेशन सिंदूर’? शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा
पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास शत्रूविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ या थेट लष्करी कारवाईची घोषणा केली. भारतीय जवानांनी थेट सीमारेषा ओलांडून पाकिस्तानचा पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर जोरदार प्रहार केला. या धडक कारवाईत भारताने तब्बल 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे अनेक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. सलग 3 दिवस चाललेल्या या घनघोर युद्धानंतर, अखेर 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अधिकृतपणे शस्त्रसंधी लागू झाली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number