Japan Muslim Burial Issue: ‘मुस्लिम मृतदेह मूळ देशातच पाठवावा…’; मुस्लिमांना दफनभूमीसाठी जागा देण्यास जपान सरकारने का दिला नकार?

देशातील मुस्लिम नागरिक व रहिवाशांनी मागितलेल्या अतिरिक्त दफनभूमीसाठी जमीन देण्यास सरकारने नकार दिला आहे. मृतदेह दफन करण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवावे, असा सल्लाही सरकारने दिला आहे.

Japan Muslim Burial Issue: ‘मुस्लिम मृतदेह मूळ देशातच पाठवावा…’; मुस्लिमांना दफनभूमीसाठी जागा देण्यास जपान सरकारने का दिला नकार?

Japan Muslim Burial Issue: जपान सरकारकडून एक महत्त्वाची आणि वादग्रस्त बाब समोर आली आहे. देशातील मुस्लिम नागरिक व रहिवाशांनी मागितलेल्या अतिरिक्त दफनभूमीसाठी जमीन देण्यास सरकारने नकार दिला असून, मृतदेह दफन करण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवावे, असा सल्ला सरकारने दिल्याचे वृत्त आहे. जपानमध्ये सध्या सुमारे 2 लाख मुस्लिम लोकसंख्या आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि भूखंडांच्या टंचाईमुळे मोठ्या दफनभूमी उभारणे अवघड बनले आहे. जपानी शहरांमध्ये जमिनीचे दर अत्यंत जास्त असून, सार्वजनिक जागेवर दफनभूमी वाढवण्याची क्षमता कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

बौद्ध व शिंटो परंपरेचा प्रभाव

जपानमध्ये मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळजवळ 99 टक्के प्रकरणांमध्ये शवदाह पद्धत वापरली जाते. बौद्ध आणि शिंटो धर्माच्या परंपरांमध्ये दफनपद्धतीला स्थान नसल्याने देशात दफनभूमी फारच मर्यादित आहेत. इस्लाममध्ये मात्र दफन करणे धार्मिकदृष्ट्या अनिवार्य मानले जाते. त्यामुळे हा निर्णय परदेशी मुस्लिम नागरिकांसह जपानी नागरिकत्व मिळवलेल्या मुस्लिमांसाठीही मोठे आव्हान ठरत आहे. 

हेही वाचा – Pakistan Sent Expired Food Items to Sri Lanka: पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा उघड! श्रीलंकेला पाठवल्या कुजलेल्या, कालबाह्य झालेल्या वस्तू

मुस्लिम समुदायामध्ये नाराजी

सरकारच्या या भूमिकेमुळे जपानमधील मुस्लिम समुदायात नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे. योग्य दफनभूमी उपलब्ध नसल्याने, अनेकांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे अवशेष मायदेशी पाठवण्यावाचून पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हेही वाचा – India Allowed Pakistani Aircraft : ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पाकिस्तानी विमानाला भारताच्या हवाई हद्दीत परवानगी; तरीही पाकिस्तानचा खोटारडेपणा

जपानची धर्मनिहाय लोकसंख्या

अलीकडील आकडेवारीनुसार जपानची लोकसंख्या 12 कोटींपेक्षा जास्त आहे. जपानच्या लोकसंख्येच्या 48.6 टक्के शिंटो धर्मीय आहेत, तर बौद्ध धर्मीय 46.4 टक्के आहेत. ख्रिश्चन धर्मीयांचा वाटा अंदाजे 1.1 टक्के आहे आणि इतर धर्मांचे अनुयायी 4 टक्के आहेत. अहवाल दर्शवितात की जपानमध्ये मुस्लिमांची संख्या कमी आहे, परंतु ती वेगाने वाढत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number