Asha Bhosle Death Reason: अनेक अवयवांनी एकदाचं थांबवलं काम… ‘या’ गंभीर संसर्गामुळे मालवली आशा ताईंची प्राणज्योत

प्रकृती अचानक खालावल्यामुळे 11 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.

Asha Bhosle Death Reason: अनेक अवयवांनी एकदाचं थांबवलं काम… ‘या’ गंभीर संसर्गामुळे मालवली आशा ताईंची प्राणज्योत

Asha Bhosle Death Reason: बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले आता आपल्यात राहिल्या नाहीत. 12 एप्रिल रोजी, वयाच्या 92 व्या वर्षी, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अचानक खालावल्यामुळे 11 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण देश आणि जगभरातील चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

निधनाचे नेमके कारण: अनेक अवयवांनी काम थांबवले
आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांची नात जनाई हिने त्यांच्या आजाराविषयी आणि निधनाच्या नेमक्या कारणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आशा ताईंना गेल्या काही दिवसांपासून छातीचा संसर्ग (Chest Infection) झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच हा संसर्ग शरीरात पसरला आणि त्यानंतर त्यांच्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे थांबवले (Multi-organ failure). याच गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा – Amit Shan On Asha Bhosle Passed Away : ओम शांती शांती शांती… केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून आशा भोसले यांना भावनिक श्रद्धांजली

92 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाचा अंत
आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत अत्यंत उत्साहाने आपले जीवन जगले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्या संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या. मात्र, वाढत्या वयानुसार निर्माण झालेल्या शारीरिक व्याधींनी अखेर या महान गायिकेला आपल्यातून हिरावून नेले. भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा आज खऱ्या अर्थाने अंत झाला असून, त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब, नातवंडे आणि कोट्यवधी चाहते पोरके झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number