Railways Recruitment 2026: रेल्वेमध्ये मेगाभरती! 11 हजारांहून अधिक लोको पायलट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ‘या’ तारखेपासून करा अर्ज

रेल्वे मंत्रालयाने सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या भरतीला हिरवा कंदील दाखवला असून, देशभरातील 17 रेल्वे झोनमध्ये एकूण 11,127 जागा भरल्या जाणार आहेत.

Railways Recruitment 2026: रेल्वेमध्ये मेगाभरती! 11 हजारांहून अधिक लोको पायलट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ‘या’ तारखेपासून करा अर्ज

Railways Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे मंत्रालयाने सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या भरतीला हिरवा कंदील दाखवला असून, देशभरातील 17 रेल्वे झोनमध्ये एकूण 11,127 जागा भरल्या जाणार आहेत. या संदर्भात रेल्वे भरती मंडळाने (RRB) 2026-27 या वर्षासाठीची संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे.

महत्वाच्या तारखा आणि वेळापत्रक 
रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना 15 मे 2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येतील. अर्ज करण्याची प्रक्रिया 14 जून 2026 रोजी मध्यरात्री (11:59 वाजता) संपणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

जागांचा तपशील (प्रमुख झोन):
या भरतीमध्ये सर्वाधिक जागा खालील तीन झोनमध्ये आहेत:

ईस्ट कोस्ट रेल्वे: 1625 पदे
साऊथ ईस्टर्न रेल्वे: 1531 पदे
सेंट्रल रेल्वे (मध्य रेल्वे): 1400 पदे

याशिवाय मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि सिकंदराबाद अशा सर्व प्रमुख आरआरबी मंडळांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाईल.

पात्रता आणि वयोमर्यादा 

शैक्षणिक पात्रता: अर्जदार किमान 10th उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेडमध्ये (उदा. फिटर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक) ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका (Diploma) किंवा पदवी (Degree) धारकही या पदांसाठी पात्र आहेत.
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाईल:

CBT 1: पहिली संगणक आधारित चाचणी.
CBT 2: दुसरी संगणक आधारित चाचणी.
CBAT: संगणक आधारित अभियोग्यता चाचणी.
कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी.

हेही वाचा – 11th Admission 2026: विद्यार्थ्यांनो तयार व्हा! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मेपासून सुरुवात

अर्ज कोठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज नोंदवावा. अधिकृत वेबसाईट: rrbapply.gov.in उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी रेल्वेने प्रसिद्ध केलेली अधिकृत सविस्तर सूचना नीट वाचून घ्यावी.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number