PoK Protests: पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड उद्रेक; 600 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक, पाकिस्तान सरकारविरुद्ध जनतेचं मोठं बंड

एकीकडे स्वतःची आर्थिक घसरण रोखण्यात अपयशी ठरलेला पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असतानाच, आता पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनेच पाकिस्तानी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

PoK Protests: पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड उद्रेक; 600 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक, पाकिस्तान सरकारविरुद्ध जनतेचं मोठं बंड

PoK Protests: गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक चणचण, वाढती महागाई, उपासमार आणि गरिबीच्या गर्तेत अडकलेला पाकिस्तान आता एका नव्या आणि अत्यंत गंभीर अंतर्गत संकटाचा सामना करत आहे. एकीकडे स्वतःची आर्थिक घसरण रोखण्यात अपयशी ठरलेला पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असतानाच, आता पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) जनतेनेच पाकिस्तानी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. येथील नागरिकांमध्ये पाकिस्तानातील अन्यायी राजवटीविरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

पाकिस्तानी प्रशासनाकडून स्थानिक जनतेवर होणारे अत्याचार आणि दडपशाही या आंदोलनाचे मुख्य कारण ठरले आहे. सरकारने 600 पेक्षा अधिक सामाजिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केल्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला आहे. या व्यापक जनआंदोलनाचा मुख्य चेहरा असलेले नेते शौकत नवाज मीर यांना पाकिस्तानी सैन्याने नजरकैदेत ठेवले आहे. या अटकेनंतर 'जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी' (JAAC) ही संघटना अधिकच आक्रमक झाली असून, त्यांनी पाकिस्तानी सरकारला थेट आव्हान देत आंदोलनाची धार तीव्र केली आहे.

सोशल मीडियावर आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल; भारताकडे मदतीची याचना
या ऐतिहासिक बंडादरम्यान एक अत्यंत महत्त्वपूर्ण वळण पाहायला मिळत आहे. आंदोलनातील आघाडीच्या काही नेत्यांनी थेट भारताकडे मदतीची गुहार लावली आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या आंदोलनाचा एक व्हिडिओ वेगाने प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये 'जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी'चे (JAAC) सक्रिय सदस्य सरदार अमन खान हे पाकिस्तानातील जुलमी राजवट, पिठाचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईवर कडाडून बोलताना दिसत आहेत.

हेही वाचा – LNG Supply: देशातील गॅस पुरवठा पूर्ववत; केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावरील आपत्कालीन निर्बंध अखेर मागे

काश्मिरी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन
अमन खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सीमाभागातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पुंछ, मेंढर, राजौरी, जम्मू, लडाख, कारगील आणि बाल्टिस्तान या सर्व क्षेत्रांतील जनतेला आवाहन केले आहे की, सर्वांनी आपापसातील भेद विसरून एक व्हावे आणि पाकिस्तानातील हुकूमशाही आणि जुलमी शासनाविरोधात एकजूट दाखवून आपला आवाज बुलंद करावा. या थेट आव्हानामुळे पाकिस्तान सरकारच्या आणि लष्कराच्या गोटात कमालीची घबराट पसरली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number