Assam Flood : आसाममध्ये महापूर! गेल्या 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, 3.6 लाख लोक बेघर

गेल्या 24 तासांत आणखी 21 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे या पुरातील एकंदर मृतांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांना या आपत्तीचा जोरदार तडाखा बसला आहे.

Assam Flood : आसाममध्ये महापूर! गेल्या 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, 3.6 लाख लोक बेघर

Assam Flood :  आसाम राज्यात निसर्गाच्या कोपामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. 'आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा'ने (ASDMA) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत आणखी 21 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे या पुरातील एकंदर मृतांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांना या आपत्तीचा जोरदार तडाखा बसला असून, सुमारे 5.64 लाखांहून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

शिवसागर जिल्ह्यामध्ये प्रचंड जीवितहानी
या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शिवसागर या जिल्ह्याला बसला आहे, जिथे अवघ्या 24 तासांच्या कालावधीत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चराईदेव येथे 5, गोलाघाट येथे 2 आणि जोरहाट येथे 1 बळी गेला आहे. या भागात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सखल भागातील हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. शिवसागरमध्ये तब्बल 3.6 लाख लोक प्रभावित झाले असून, त्याखालोखाल जोरहाटमध्ये 88,000 आणि चराईदेवमध्ये 72,500 पेक्षा जास्त नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; 4 दिवस सतर्कतेचा इशारा
ब्रह्मपुत्रा नदी नेमाटीघाट येथे धोक्याच्या चिन्हाच्या वरून वाहत आहे, तर 'बुरीदिहिंग' आणि 'धनसिरी' या तिच्या उपनद्याही उग्र रूप धारण करून वाहत आहेत. इतकेच नव्हे तर, 'दिखो' आणि 'दिसंग' या नद्यांनी आतापर्यंतच्या सर्वाधिक पूर-पातळीचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आगामी 4 दिवसांसाठी राज्यात 'येलो अलर्ट' जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा – Sikkim News : सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला; 20 जणांचा मृत्यू, 5 जण अजूनही ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरू

वाहतूक ठप्प अन् प्रशासनाकडून मदतकार्य सुरू
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या प्रशासनाकडून 10 जिल्ह्यांमध्ये 273 मदत छावण्या आणि वितरण केंद्रे उभारण्यात आली असून, यामध्ये 12,284 विस्थापित नागरिकांना सुरक्षित निवारा व अन्नधान्य पुरवले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number