Elvish Yadav: एल्विश यादवला सर्वोच्च न्यायायाकडून मोठा दिलासा; सापाच्या विष प्रकरणातील ‘तो’ खटला केला रद्द

तपासादरम्यान एल्विशविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि हा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.<br/>

Elvish Yadav: एल्विश यादवला सर्वोच्च न्यायायाकडून मोठा दिलासा; सापाच्या विष प्रकरणातील ‘तो’ खटला केला रद्द

Elvish Yadav: सापाच्या विषाचा कथित वापर केल्याप्रकरणी गाजलेल्या खटल्यात युट्युबर (YouTuber) एल्विश यादवला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 19 मार्च 2026 रोजी निकाल देताना, सर्वोच्च न्यायालयाने एल्विशविरुद्धचा हा खटला पूर्णपणे रद्द केला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. तपासादरम्यान एल्विशविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि हा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी आणि गंभीर आरोप
हे प्रकरण सर्वप्रथम सप्टेंबर 2023 मध्ये समोर आले होते, जेव्हा हरियाणा पोलिसांनी नोएडा परिसरात एका रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या टोळीवर रेव्ह पार्ट्यांमध्ये मौजमजेसाठी सापाच्या विषाचा अमली पदार्थ म्हणून पुरवठा केल्याचा आरोप होता. या प्रकरणात एल्विश यादववर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 8(2) सह इतर गंभीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपांमुळे एल्व्हिशच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.

“सत्याचा विजय”; एल्विशची पहिली प्रतिक्रिया
एल्विश यादवने सुरुवातीपासूनच आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. ज्या व्हिडिओंच्या आधारे हे आरोप करण्यात आले, ते व्हिडिओ जुने असून त्यात विषाचा कोणताही वापर झाला नसल्याचा दावा त्याने केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एल्विशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया देताना “सत्याचा नेहमीच विजय होतो, जय श्री राम,” अशी पोस्ट केली आहे. या निकालामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा – Doraemon Director Died: लहानपण समृद्ध करणारा जादूगार हरपला; डोरेमोनचे दिग्दर्शक शिबायामा सुतोमू यांनी घेतला जगाचा निरोप

न्यायालयाची कडक ताकीद आणि निरीक्षणे
खटला रद्द केला असला तरी, यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सेलिब्रिटींच्या वर्तणुकीवर कडक ताकीद दिली होती. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी सापांसारख्या मुक्या जीवांचा गैरवापर केल्यास समाजात चुकीचा संदेश जातो, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच, प्राण्यांशी अशा प्रकारे संवाद साधणे किंवा त्यांचा वापर करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला होता. मात्र, सध्याच्या निकालाने पुराव्यांच्या अभावी एल्विशला या आरोपांतून मुक्त केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number