Nepal Currency Rules: नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; आता 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटा चालणार; पण ‘या’ नियमांचे करावे लागेल पालन

नवीन नियमांनुसार दोन्ही देशांतील नागरिकांना प्रति व्यक्ती 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम सीमापार ने-आण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Nepal Currency Rules: नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; आता 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटा चालणार; पण ‘या’ नियमांचे करावे लागेल पालन

 Nepal Currency Rules: भारत आणि नेपाळदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिक, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी नेपाळ सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) भारतीय चलनांच्या ने-आणीवरील निर्बंध शिथिल केले असून आता भारतीय व नेपाळी नागरिक 9 नोव्हेंबर 2016 नंतर जारी केलेल्या 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटा नेपाळमध्ये सोबत घेऊन जाऊ शकतात. नवीन नियमांनुसार दोन्ही देशांतील नागरिकांना प्रति व्यक्ती 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम सीमापार ने-आण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकेने सुरुवातीला 11 फेब्रुवारी रोजी 'नेपाळ गॅझेट'मध्ये ही तरतूद प्रकाशित केली होती, ज्यानंतर अंमलबजावणी आणि सीमापार व्यवहाराबाबत स्पष्टीकरण देणारी औपचारिक अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली.

या नियमावलीबाबत अधिक माहिती देताना NRB चे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल यांनी स्पष्ट केले की, ही सवलत केवळ भारत आणि नेपाळदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठीच मर्यादित आहे. नेपाळी नागरिकांना भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही तिसऱ्या देशातून नेपाळमध्ये भारतीय चलन आणता येणार नाही, तसेच नेपाळमधून बाहेर नेलेले भारतीय चलन केवळ भारतातच वापरता येईल. 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतात झालेल्या नोटाबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे नेपाळने हे कडक निर्बंध लादले होते. आता या नियमांत बदल केल्यामुळे नेपाळला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांचा प्रवास सुकर होईल, तसेच भारतासोबत व्यापार व व्यवसाय करणाऱ्या नेपाळी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा –सर्वात मोठी तेल कंपनी Aramco वर मिसाइल आणि ड्रोन हल्ला! अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल; जागतिक तेल पुरवठ्यावर संकटाचे ढग

भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि पर्यटनाचा मुख्य स्रोत आहे, तसेच हजारो नेपाळी नागरिक शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी भारतात ये-जा करत असतात. याच पार्श्वभूमीवर परकीय चलनाबाबतही NRB ने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. नवीन नियमांनुसार, कोणत्याही प्रकारची सीमाशुल्क घोषणा न करता नेपाळी नागरिक आणि परदेशी पर्यटक 5,000 अमेरिकन डॉलर्स किंवा इतर चलनांमधील तितक्याच मूल्याची रक्कम नेपाळमध्ये आणू शकतात. तथापि, या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम असल्यास नेपाळमध्ये आगमन झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा करणे अनिवार्य असणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number