Solar Flare: अंतराळात महासंकट? सूर्यावरील सर्वात मोठ्या स्फोटानंतर जागतिक वैज्ञानिक हाय-अलर्टवर; पृथ्वीवर काय होणार परिणाम?

सूर्याच्या पृष्ठभागावर नुकताच एक अत्यंत विनाशकारी आणि शक्तिशाली 'X-class' स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Solar Flare: अंतराळात महासंकट? सूर्यावरील सर्वात मोठ्या स्फोटानंतर जागतिक वैज्ञानिक हाय-अलर्टवर; पृथ्वीवर काय होणार परिणाम?

Solar Flare: सूर्याच्या पृष्ठभागावर नुकताच एक अत्यंत विनाशकारी आणि शक्तिशाली 'X-class' स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 जुलैच्या मध्यरात्री नोंदवला गेलेला हा सौर स्फोट (सोलर फ्लेअर) विश्वातील सर्वात तीव्र प्रकारचा मानला जातो. या अद्भूत आणि तितक्याच चिंताजनक घटनेमुळे जागतिक पातळीवरील अंतराळ संस्था कमालीच्या सतर्क झाल्या असून, अंतराळ हवामानात होणाऱ्या बदलांवर शास्त्रज्ञ आता चोवीस तास बारीक लक्ष ठेवून आहेत.

काय आहे रशियन शास्त्रज्ञांचा दावा? श्रेणी कशी ठरते?
रशियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सोलर लॅबोरेटरीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा महास्फोट 1 जुलैच्या रात्री घडला. अंतराळ विज्ञानात सौर ज्वाळांची तीव्रता मोजण्यासाठी A, B, C, M आणि X अशा एकूण 5 श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 'X-class' ही सर्वात धोकादायक आणि सर्वोच्च श्रेणी मानली जाते. विशेष म्हणजे, यातील प्रत्येक पुढील श्रेणी ही आधीच्या श्रेणीच्या तुलनेत तब्बल 10 पट अधिक शक्तिशाली असते, ज्यावरून या ताज्या स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो.

दळणवळण यंत्रणा कोलमडणार? जाणून घ्या संभाव्य परिणाम
शास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या महास्फोटांमधून अंतराळात प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि चार्ज्ड पार्टिकल्स (भारित कण) बाहेर फेकले जातात. हा उद्रेक जर 'कोरोनल मास इजेक्शन' (CME) च्या स्वरूपात थेट पृथ्वीच्या दिशेने सरकला, तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी त्याचा जोरदार संघर्ष होऊन 'भू-चुंबकीय वादळ' (Geomagnetic Storm) निर्माण होऊ शकते. याचे थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतात; जसे की GPS यंत्रणा, उपग्रह सेवा, हाय-फ्रिक्वेन्सी रेडिओ संपर्क आणि काही अतिसंवेदनशील भागांतील वीज पुरवठा (पॉवर ग्रीड्स) तात्पुरता खंडित होऊ शकतो.

30 जूनलाही घडली होती घटना
हा 'X-class' स्फोट अचानक झालेला नाही, तर त्यापूर्वी सूर्यामध्ये मोठ्या घडामोडी सुरू होत्या. शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे की, या मुख्य स्फोटाच्या अगदी एक दिवस आधी, म्हणजेच 30 जून रोजी सूर्यावर एकापाठोपाठ एक असे सलग 3 'M-class' स्फोट झाले होते. 'M-class' ही 'X-class' च्या खालोखाल येणारी दुसरी सर्वात मोठी श्रेणी आहे. अवघ्या काही तासांत झालेल्या या मोठ्या हालचालींमुळे सूर्य सध्या प्रचंड खवळलेल्या स्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सूर्याच्या पोटात नक्की काय चाललंय? बर्मिंगहॅम विद्यापीठाचे संशोधन
सूर्याच्या गर्भात दडलेले हे रहस्य शोधण्यासाठी बर्मिंगहॅम विद्यापीठाचे संशोधक अहोरात्र काम करत आहेत. सूर्याच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या लहरी आणि कंपनांचा (vibrations) अभ्यास सध्या केला जात आहे. हे अंतर्गत कंपन सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्राशी थेट जोडलेले असून, त्याचा थेट प्रभाव संपूर्ण अंतराळातील हवामानावर पडत असल्याचे संशोधनातून समोर येत आहे.

हेही वाचा – Whatsapp चं नवीन फिचर वादात, केंद्राने उपस्थित केले प्रश्न, कंपनीने दिली प्रतिक्रिया

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सूर्य सध्या त्याच्या 11 वर्षांच्या सौर चक्राच्या (Solar Cycle) अत्यंत सक्रिय आणि सर्वोच्च टप्प्यात (Peak Phase) प्रवेश करत आहे. या विशिष्ट कालखंडात सूर्यावर प्रचंड प्रमाणात डाग निर्माण होतात आणि सौर वादळांचे प्रमाण कमालीचे वाढते. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारच्या अनेक खगोलीय घटना आणि सौर स्फोट पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक अंतराळ संस्थांचा हाय-अलर्ट
सध्या तरी या सौर वादळाच्या अचूक परिणामांचा अंदाज घेण्यासाठी वैज्ञानिक गणिते मांडली जात आहेत. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या ऊर्जेचा वेग, मार्ग आणि दिशा यांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच पुढील धोका स्पष्ट होईल. तोपर्यंत जगातील सर्व प्रमुख अंतराळ संस्था या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number