Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टच्या धार्मिक समितीत मोठे बदल; स्वामी गोविंद देव गिरी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

अयोध्येत पार पडलेल्या 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या महत्त्वपूर्ण बैठकीत धार्मिक समितीची पुनर्रचना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टच्या धार्मिक समितीत मोठे बदल; स्वामी गोविंद देव गिरी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

Ram Mandir Trust: अयोध्येत पार पडलेल्या 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या महत्त्वपूर्ण बैठकीत धार्मिक समितीची पुनर्रचना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या 7 सदस्यीय समितीमध्ये अयोध्येतील 5 स्थानिक संतांचा समावेश करण्यात आला असून, राम मंदिरातील सर्व धार्मिक विधी, परंपरा आणि पूजेच्या नियमावलीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार या समितीकडे असणार आहेत.

बैठकीला प्रमुख संतांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, स्वामी वासुदेवानंद सरस्वती, स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ जी महाराज, कृष्ण मोहन, दिनेश जी, युग पुरुष परमानंद गिरी जी महाराज, स्वामी दिनेन्द्र दास, पी. एस. लोखंडे, अयोध्येचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी आणि स्वामी कमल नयन दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिक्त पदे आणि नवीन सरचिटणीसांच्या घोषणेकडे देशवासियांचे लक्ष
चंपत राय यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्रस्टचे नवीन सरचिटणीस कोण असणार आणि बऱ्याच काळापासून रिक्त असलेली 2 पदे कधी भरली जाणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आजच्या बैठकीत या प्रमुख पदांवरील नियुक्तीबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसून, याबाबतची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (CEO) निवडीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ
राम मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पद भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्राप्त अर्जांची छाननी करून योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी निवड समितीने 1 महिन्याचा अतिरिक्त वेळ मागितला होता, ज्याला ट्रस्टने मंजुरी दिली आहे. परिणामी, CEO च्या नियुक्तीची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Delhi Police NHRC Complaint: दिल्ली पोलिसांविरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार; साध्या वेशातील व्यक्तींकडून तरुणींना मारहाण केल्याचा आरोप

1 आठवड्यात होणार रिक्त पदांची भरती; प्रवक्ता अन् सचिवांचीही होणार नियुक्ती
मंदिरातील भाविकांची सातत्याने वाढणारी गर्दी आणि वाढता कार्यभार लक्षात घेता, प्रशासकीय सोयीसाठी नवीन सचिवांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ट्रस्टचे अधिकृत निर्णय आणि माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका प्रवक्त्याची निवड केली जाईल. ट्रस्ट मधील रिक्त पदे येत्या 1 आठवड्याच्या आत भरण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी, नवीन सरचिटणीसांच्या नावावरील सस्पेन्स अजूनही कायम आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number