Pollution in Metro Cities in India : दिल्लीतील हवेची गुणवत्ता (Air Quality) खालावत असताना, या प्रदूषणाच्या पातळीबाबत एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चा सुरू झाली आहे. कुणाल कुशवाहा नावाच्या लंडनस्थित भारतीय अभियंत्याने दिल्लीला भेट दिल्यानंतर ‘एक्स’वर ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नागरिकांना त्यांच्या आरोग्याला (Health) प्राथमिकता देऊन ‘कर्जात बुडाले तरी चालेल, पण दिल्ली सोडा’, असे भावनिक आवाहन केले आहे. यासोबतच, त्यांनी मुंबईबाबत (Mumbai) केलेले भाष्यही सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
हेही वाचा – Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…
प्रदूषणामुळे श्वास घेणे झाले कठीण
कुणाल कुशवाह यांनी आपल्या पोस्टमध्ये आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “मला नेहमी वाटायचे की, दिल्लीतील लोकांसाठी हवेची गुणवत्ता खरोखर किती वाईट असू शकते? ती वाईट आहे हे मला माहीत होते. परंतु, ती इतकी वाईट असेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी दिल्लीतच वाढलो आणि शिक्षण घेतले, पण मला कधीही इतका मोठा फरक जाणवला नव्हता.”
Leave Delhi, go in debt if you have to. I used to think, how bad can the AQI really be for people in Delhi? I knew it was bad, but I never understood the scale because I didn’t feel it as drastically. I grew up in Delhi, studied here, and never felt a huge difference. You see… pic.twitter.com/OV5RVE351C — Kunal Kushwaha (@kunalstwt) November 22, 2025
स्वच्छ हवेत श्वास घेत लंडनमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर, दिल्लीत उतरताच मला प्रदूषणाची चव आणि वास येऊ लागला. ‘माझा घसा खवखवू लागला आणि फुफ्फुसात जणू सुया टोचल्यासारखे वाटू लागले. मला प्रत्यक्षात प्रदूषण माझ्या शरीरात शिरताना जाणवत होते,’ असे ते पुढे म्हणाले.
‘इतर मेट्रो शहरेही सोडा’
या पोस्टमध्ये कुणाल कुशवाह यांनी नागरिकांना इतर सर्व गोष्टींपेक्षा त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी प्रदूषणाने त्रस्त असलेल्या प्रमुख मेट्रो (Metro) शहरांमध्ये मालमत्ता (Property) खरेदी करण्याविरोधातही इशारा दिला. ते म्हणाले, “कृपया स्वतःसाठी ही शहरे सोडा. येथे मालमत्ता खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही. मुंबईसाठीही हेच लागू होते. जर तुम्हाला शक्य असेल, तर तुमच्या बॅगा पॅक करा आणि दुसरीकडे काम शोधा. मी उद्याच हे शहर सोडत आहे.”
युजर्सच्या प्रतिक्रिया
कुशवाह यांच्या या पोस्टमुळे दिल्लीच्या प्रदूषणाबाबत पुन्हा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने (User) म्हटले की, “‘दिल्ली सोडा’ हा पर्याय काही मोजक्या लोकांसाठी उत्तम सल्ला आहे. बाकीच्यांकडे दुसरीकडे जाऊन राहण्याची किंवा तेथे काम-धंदा करण्याची योजना नाही. तर, प्रदूषण कमी कसे होईल, यावरील योजनेची आवश्यकता आहे.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “आपल्यापैकी 99% लोकांसाठी शहर सोडून निघून जाणे हा पर्याय नाही. आमच्यापैकी बहुतेक जण येथे अडकले आहेत, कारण नोकरी, कुटुंब सर्वकाही या शहरातच आहे.”