Income Tax Saving 2026: आयकर वाचवण्याची शेवटची संधी! 31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे पूर्ण करा, अन्यथा सोसावा लागेल मोठा आर्थिक फटका

जर तुम्ही 'जुन्या कर प्रणाली'चा (Old Tax Regime) पर्याय निवडला असेल, तर कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आता केवळ काहीच दिवस उरले आहेत.

Income Tax Saving 2026: आयकर वाचवण्याची शेवटची संधी! 31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे पूर्ण करा, अन्यथा सोसावा लागेल मोठा आर्थिक फटका

Income Tax Saving 2026: आर्थिक वर्ष 2025-26 आता अंतिम टप्प्यात असून 31 मार्च 2026 ही तारीख कर नियोजनासाठी (Tax Planning) अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही 'जुन्या कर प्रणाली'चा (Old Tax Regime) पर्याय निवडला असेल, तर कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आता केवळ काहीच दिवस उरले आहेत. आयकर विभागाच्या नियमांनुसार, या मुदतीपूर्वी गुंतवणूक न केल्यास तुम्हाला केवळ मोठा करच भरावा लागणार नाही, तर अनेक सरकारी योजनांच्या फायद्यांपासूनही वंचित राहावे लागू शकते.

कलम 80C आणि 80D अंतर्गत बचतीची संधी
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा करता येतो. यासाठी PPF, ELSS (कर-बचत म्युच्युअल फंड) किंवा सुकन्या समृद्धी योजनेत 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. तसेच, PPF आणि NPS सारखी खाती सक्रिय ठेवण्यासाठी किमान वार्षिक ठेव जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा खाते 'निष्क्रिय' होऊन दंड भरावा लागू शकतो. याव्यतिरिक्त, कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्याच्या (Health Insurance) हप्त्यांवर 25,000 ते 75,000 पर्यंतची अतिरिक्त सवलत मिळवता येते.

पगारदार व्यक्तींनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. कंपन्यांचा HR विभाग पगार प्रक्रिया करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या पुराव्यांची मागणी करतो. जर तुम्ही तुमच्या LIC च्या पावत्या, घरभाडे करार (Rent Agreements) किंवा मुलांच्या शैक्षणिक शुल्काच्या पावत्या वेळेत सादर केल्या नाहीत, तर तुमच्या पगारातून TDS (उगमस्थानी कर कपात) म्हणून मोठी रक्कम कापली जाऊ शकते. एकदा टॅक्स कापला गेल्यावर त्याचा परतावा (Refund) मिळवण्यासाठी आयकर विवरणपत्र भरेपर्यंत दीर्घकाळ वाट पाहावी लागते.

हेही वाचा – Difference Between Lpg Cng & Png: सिलेंडरमधला LPG, पाइपमधला PNG आणि गाडीतला CNG; पण 'या' तिन्ही गॅसमध्ये नेमका फरक काय?

अग्रिम कर आणि दंडापासून बचावासाठी उपाय
ज्यांचे करदायित्व 10,000 पेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी अग्रिम कराचा (Advance Tax) हप्ता भरणे अनिवार्य आहे. 15 मार्चची मुदत चुकली असल्यास, कलम 234B आणि 234C अंतर्गत दरमहा 1 टक्के दराने लागणारे व्याज टाळण्यासाठी 31 मार्चपूर्वी पेमेंट पूर्ण करणे हिताचे ठरेल. तसेच, जुन्या आयटीआर (ITR) मधील चुका सुधारण्यासाठी 'अद्ययावत विवरणपत्र' दाखल करण्याचीही ही शेवटची संधी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number