Laser Beam Disturbance Flight Landing : लँडिंगवेळी वैमानिकाच्या डोळ्यांवर लेझर लाईट; मोठा अपघात होता होता अगदी थोडक्यात…

या विमानामध्ये एकूण 159 प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत लँडिंग थांबवले आणि काही वेळ आकाशातच घिरट्या घातल्या.

Laser Beam Disturbance Flight Landing : लँडिंगवेळी वैमानिकाच्या डोळ्यांवर लेझर लाईट; मोठा अपघात होता होता अगदी थोडक्यात…

Malaysia Airlines Kolkata Laser Light Incident: कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात सुदैवाने टळला आहे. मलेशिया एअरलाइन्सचे MH-184 हे विमान क्वालालंपूरवरून रात्री 11:20 च्या सुमारास कोलकात्यात उतरण्याच्या तयारीत होते. मात्र, धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचले असतानाच जमिनीवरून कॉकपिटच्या दिशेने आलेला तीव्र लेझर बीम थेट वैमानिकाच्या डोळ्यांवर पडला. अचानक झालेल्या या प्रकाशामुळे वैमानिकाची दृष्टी काही क्षणांसाठी अंधुक झाली आणि मोठा गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ लँडिंग रद्द करत विमानाला पुन्हा आकाशाकडे झेपावले.

159 प्रवाशांचा जीव टांगणीला; आकाशात काही मिनिटे घिरट्या
या विमानामध्ये एकूण 159 प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत लँडिंग थांबवल्यानंतर विमानाने पुढील काही मिनिटे आकाशातच घिरट्या घातल्या. दृष्टी पूर्ववत होईपर्यंत आकाशात सुरक्षित फेऱ्या मारल्यानंतर, परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आल्याची खात्री करून वैमानिकाने अखेर रात्री 11:25 च्या सुमारास विमानाचे विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरल्यानंतर प्रवाशांसह विमानतळ प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा – Air India flight Turbulence : आकाशात थरार! एअर इंडियाचं विमान अचानक 300 फूट खाली आलं; नशेत असलेल्या पायलटवर कारवाईची टांगती तलवार

विमानतळ प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या गंभीर घटनेनंतर मलेशिया एअरलाइन्स प्रशासनाने तातडीने कोलकाता विमानतळ अधिकाऱ्यांकडे लेझर लाईटच्या या जीवघेण्या व्यत्ययाबाबत अधिकृत माहिती दिली. विमान उतरत असताना अशा प्रकारे लेझर लाईट मारणे हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि धोकादायक गुन्हेगारी प्रकार मानला जातो. या तक्रारीची तातडीने दखल घेत कोलकाता विमानतळ प्रशासनाने स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पोलिसांकडून तपास सुरू
विमानतळ परिसरामध्ये अशा प्रकारे लेझर लाईटचा वापर करणे बेकायदेशीर असून यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याप्रकरणी पोलीस सध्या घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती गोळा करत असून लेझर लाईट मारणाऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत. सुदैवाने या घटनेत सर्व 159 प्रवासी आणि विमानातील कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित राहिले असले, तरी या प्रकारामुळे हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

हेही वाचा – Workplace Harassment: धक्कादायक! ऑफिसमधील वाढत्या मानसिक छळाला कंटाळून महिलेनं स्वतःला संपवलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number