Crowd in front of Adiala Jail : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या कथित हत्येच्या अफवांमुळे सध्या देशात मोठी खळबळ उडाली आहे. 2023 पासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात (Adiala Jail) असलेले इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल आणि जिविताबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खान यांना भेटण्यास त्यांच्या बहिणींना आणि समर्थकांना रोखण्यात आल्याने ही अफवा अधिकच वेगाने पसरली आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
मंगळवारी रात्री (25 नोव्हेंबर) इम्रान खान यांच्या बहिणी – नोरीन खान, अलीमा खान आणि उजमा खान – त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचल्या होत्या. मात्र, तुरुंग प्रशासनाने त्यांना खान यांना भेटू दिले नाही आणि त्यांना तिथून बळजबरीने पिटाळून लावले. इतकेच नव्हे तर, त्यांना मारहाण झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. पीटीआयच्या (PTI) कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या नेत्याला भेटण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
अफगाणिस्तानी माध्यमांनी तर इम्रान खान यांची रावळपिंडी तुरुंगात हत्या (Assassination) झाल्याचे वृत्त दिले आहे, ज्यामुळे पाकिस्तानात (Pakistan) राजकीय आणि सामाजिक तणाव वाढला आहे. सरकारकडून या बातम्या केवळ अफवा (Imran Khan Assassination Rumors) असल्याचे सांगितले जात असले तरी, जर इम्रान खान जिवंत आणि सुरक्षित आहेत, तर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू का दिले जात नाही, असा संतप्त सवाल त्यांचे समर्थक समाजमाध्यमांवर शाहबाज शरीफ यांच्या सरकारला विचारत आहेत.
हेही वाचा – Russia Oil Import In India: भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करणार? अमेरिकेच्या निर्बंधांनी बदलली ऊर्जा समीकरण
यामुळे तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे हजारो कार्यकर्ते आदियाला तुरुंगाबाहेर जमले आहेत. ते तुरुंग प्रशासनाकडे आपल्या नेत्याच्या आरोग्याबद्दल माहिती मागत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी आणि समर्थकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरुंगाबाहेर शेकडोंच्या संख्येने सुरक्षा रक्षक (Security at Adiala Jail) तैनात करण्यात आले आहेत.
इम्रान खान यांच्या बहिणी (अलीमा खान, डॉ. उजमा आणि नोरीन नियाजी) आणि पक्षाच्या अन्य नेत्यांना तुरुंगाजवळ असलेल्या फॅक्ट्री नाका परिसरात रोखण्यात आले होते. पुढे जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी तिथेच ठिय्या देत आंदोलन करण्यास सुरुवात केली. या वेळी पंजाब पोलिसांकडून अतिशय निर्घृणपणे हिंसाचार केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Micro Drones: डोळ्यांना न दिसणारे ‘मायक्रो ड्रोन्स’! अमेरिका-चीनमध्ये नवा शस्त्रसंघर्ष