Paush Month 2025: पौष महिन्यात मंगल कार्यांना ‘ब्रेक’! तरीही ‘ही’ पुण्यकर्म करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा; जाणून घ्या ‘खरमास’ म्हणजे काय?

पौष महिन्यात भगवान सूर्याची उपासना करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, या महिन्यात सूर्यदेवाच्या 11000 किरणांमधून विशेष ऊर्जा आणि आरोग्याचे वरदान प्राप्त होते.

Paush Month 2025: पौष महिन्यात मंगल कार्यांना ‘ब्रेक’! तरीही ‘ही’ पुण्यकर्म करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा; जाणून घ्या ‘खरमास’ म्हणजे काय?

Paush Month 2025: मराठी पंचांगातील 10 वा महिना असलेल्या पौष महिन्याला उद्यापासून (20 डिसेंबर) सुरुवात होत आहे. शुभ कार्यांसाठी हा काळ अनुकूल मानला जात नाही. मात्र, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊ,  यामागील शास्त्रीय आणि धार्मिक कारणे..

शुभ कार्ये वर्ज्य असण्यामागचे मुख्य कारण
ज्योतिषशास्त्रानुसार, पौष महिन्यात सूर्य वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करतो, ज्याला 'धनु संक्रांती' असे म्हटले जाते. सूर्य धनु राशीत असेपर्यंतच्या काळाला 'खरमास' मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, खरमासात सूर्याचा प्रभाव आणि शुभ कार्यांसाठी लागणारी ऊर्जा काहीशी मंदावते. याच कारणामुळे या महिनाभरात विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे निषिद्ध मानले जाते. असे मानले जाते की, या काळात केलेल्या मंगल कार्यांचे फळ शुभ मिळत नाही.

सूर्य उपासनेचे विशेष महत्त्व
पौष महिन्यात भगवान सूर्याची उपासना करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, या महिन्यात सूर्यदेवाच्या 11000 किरणांमधून विशेष ऊर्जा आणि आरोग्याचे वरदान प्राप्त होते. 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारा हा महिना 20 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. या काळात दररोज सूर्याला अर्घ्य देणे, वैदिक मंत्रांचा जप करणे आणि सूर्याची भक्ती केल्याने वर्षभर शरीर निरोगी आणि समृद्ध राहते, अशी श्रद्धा आहे.

हेही वाचा – Shirdi Sai Baba: साईदरबाराची झळाळी वाढली, भक्ताकडून सुवर्ण मुकूट दान; वजन आणि किंमत वाचून थक्क व्हाल

आध्यात्मिक शुद्धीकरण आणि दानधर्म
हा महिना वैयक्तिक शुद्धीकरणासाठी आणि दानासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, हवन करणे आणि गरिबांना अन्नदान करणे यामुळे पापांचे क्षालन होते. विशेषतः 'तीळ' दान करणे या महिन्यात अत्यंत पुण्यकारक समजले जाते. तसेच नवीन धान्य प्रथम देवाला अर्पण करून मगच त्याचे सेवन करावे, अशी परंपरा आहे.

पौष महिन्यातील आहार आणि जीवनशैली
– थंडीची तीव्रता वाढत असल्याने या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
– काय खावे: शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गूळ, आले, लसूण आणि तिळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
– काय टाळावे: या काळात थंड पदार्थ खाणे टाळावे. तसेच, दररोज तेल मालिश करणे देखील निषिद्ध मानले जाते.
– भगवान सूर्य आणि पूर्वजांना दररोज नैवेद्य अर्पण केल्याने घरात सुख-शांती नांदते.

हिंदू पंचांगानुसार, या संपूर्ण महिनाभरात केवळ आध्यात्मिक साधनेवर लक्ष केंद्रित करणे योग्य मानले जाते, तर मोठे सोहळे खरमास संपल्यानंतरच करणे शुभ ठरते.

हेही वाचा – Banke Bhog Delay: मथुरेतील बांके बिहारी मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच बालभोगाला उशीर 

(Disclaimer : ही बातमी ज्योतिषशास्त्र आणि सामान्य धार्मिक माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number