Young Indian Diplomat Petel Gehlot : आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या तरुण भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या यादीत आता पेटल गहलोत यांचे नाव जोडले गेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात गरळ ओकल्यानंतर, भारताच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी त्यांचा खोटारडेपणा उघड केला.
पाकिस्तानच्या आरोपांना सडेतोड उत्तर
पेटल गहलोत यांनी उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू जल कराराबाबत केलेले बिनबुडाचे दावे खोडून काढले.
त्या म्हणाल्या, “अध्यक्ष महोदय, आज सकाळी या सभेने पाकिस्तानी पंतप्रधानांची हास्यास्पद नौटंकी पाहिली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा पुरस्कार केला, जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे.” पुढे त्यांनी ठामपणे सांगितले की, “पाकिस्तान कोणत्याही प्रकारचे नाटक किंवा कोणताही खोटारडेपणा करून वास्तव लपवू शकणार नाही.”
Morning muse.What a slap of truth at #UNGA80! @petal_gahlot shredded Terror State Pakistan, calling out their theatrics, exposing how they sheltered Osama bin Laden, and reminding the world of Pahalgam. Confident, fearless, and unapologetic. pic.twitter.com/xorS06lsxz — Aditya Patro (@TheAdityaPatro) September 27, 2025
कोण आहेत पेटल गहलोत?
जन्म आणि शिक्षण: दिल्लीत जन्मलेल्या पेटल गहलोत यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून राजशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमनमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
कारकीर्द: त्या 2015 साली भारतीय विदेश सेवेत (IFS) सामील झाल्या.
वर्तमान पद: जुलै 2023 मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्या सध्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रमुख राजनैतिक अधिकारी म्हणून काम करत आहेत.
हेही वाचा – India Slams Pakistan : ‘पाकच्या पंतप्रधानांची नौटंकी…’, UNGA मध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
परराष्ट्र मंत्रालयातील अनुभव
संयुक्त राष्ट्र संघटनेत जाण्यापूर्वी, 2020 ते 2023 या कालावधीत पेटल गहलोत यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपीयन पश्चिमी विभागात सहसचिव म्हणून काम पाहिले आहे. सहसचिव म्हणून काम करत असताना, त्यांनी पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासातही काम केले आहे.
‘गिटार डिप्लोमॅट’ म्हणून ओळख
परराष्ट्र धोरणासोबतच पेटल गहलोत यांना संगीतातही खूप रस आहे. त्या एक उत्तम गिटार वादक असून, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक स्वतः गायिलेल्या गाण्यांचे व्हिडिओज शेअर केले आहेत. त्यामुळेच त्यांना ‘गिटार डिप्लोमॅट’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी गायलेले इटलीचे प्रसिद्ध गीत ‘बेला सियाओ’ (Bella Ciao) सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.
The feeling of confusion, of being torn and of wanting everything and just one thing at the same time, encapsulated in this song from 12 years ago. A cover of ‘Kabira’ from Yeh Jawaani Hai Deewani pic.twitter.com/ASs7usWki2 — Petal Gahlot (@petal_gahlot) May 5, 2025