GPS Spoofing Detector: बनावट जीपीएस लोकेशनचा खेळ संपणार: नवे पोर्टेबल डिव्हाइस रिअल टाइममध्ये पकडणार स्पूफिंग

हे जगातील पहिले हाय-सेंसिटिव्ह आणि रिअल टाइम जीपीएस स्पूफिंग डिटेक्टर आहे. याच्यामध्ये चालत्या वाहनातही बनावट सिग्नल ओळखण्याची क्षमता आहे.

GPS Spoofing Detector: बनावट जीपीएस लोकेशनचा खेळ संपणार: नवे पोर्टेबल डिव्हाइस रिअल टाइममध्ये पकडणार स्पूफिंग

GPS Spoofing Detector : आजच्या डिजिटल युगात रस्ता शोधण्यापासून ते ऑनलाईन डिलिव्हरी ट्रॅक करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण जीपीएस (GPS) यंत्रणेवर अवलंबून आहोत. मात्र, याच यंत्रणेचा गैरवापर करून चुकीचे लोकेशन दाखवण्याचा म्हणजेच 'जीपीएस स्पूफिंग'चा धोका जगभरात वेगाने वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांनी आता एक क्रांतिकारी आणि आकाराने लहान असलेले पोर्टेबल डिव्हाइस तयार केले आहे. हे उपकरण रिअल टाइममध्ये बनावट जीपीएस सिग्नल्सचा शोध घेऊन धोके वेळीच रोखू शकते.

जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय?
जीपीएस स्पूफिंग ही एक अशी घातक युक्ती आहे, ज्यामध्ये मूळ सॅटेलाइट सिग्नल्समध्ये फेरबदल करून डिव्हाइसला खोट्या लोकेशनची माहिती पाठवली जाते. हे तंत्रज्ञान सामान्य जीपीएस जॅमरपेक्षा खूप जास्त धोकादायक मानले जाते. याचे कारण म्हणजे जॅमरमुळे सिग्नल पूर्णपणे बंद होतात, ज्यामुळे गडबड झाल्याचे लगेच समजते. स्पूफिंगमध्ये ट्रॅकिंग स्क्रीनवर सर्व काही सामान्य दिसत राहते, मात्र प्रत्यक्षात संबंधित वस्तू भलतीकडेच नेली जाते. मौल्यवान वस्तू किंवा ट्रक हायजॅक करण्यासाठी गुन्हेगारांकडून या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे.

ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीचा मोठा शोध
अमेरिकेतील ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीच्या संशोधकांनी हे जगातील पहिले हाय-सेंसिटिव्ह आणि रिअल टाइम जीपीएस स्पूफिंग डिटेक्टर तयार केले आहे. चालत्या वाहनातही बनावट सिग्नल्स अचूक ओळखण्याची क्षमता या स्मार्ट डिटेक्टरमध्ये आहे. बनावट सिग्नल हे मूळ सॅटेलाइटच्या सिग्नल इतकेच मजबूत असले, तरीही हे डिव्हाइस त्यातील फरक सहज पकडू शकते. सध्याच्या उपलब्ध यंत्रणांच्या तुलनेत हे तंत्रज्ञान कमालीचे वेगवान आणि विश्वासार्ह असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

हेही वाचा – TTE Body Cameras: तिकीट तपासणी आता होणार कॅमेऱ्यात कैद; TTE च्या गणवेशावरील हाय-टेक गुप्तहेरामुळे उडाली प्रवाशांची झोप

कसे काम करते हे नवे उपकरण?
पारंपारिक जीपीएस सिस्टीम ही पूर्णपणे सॅटेलाइट सिग्नल्सवर अवलंबून असते, परंतु हे नवीन डिटेक्टर वेगळ्या धर्तीवर काम करते. हे उपकरण कोणत्याही पारंपारिक जीपीएस रिसीव्हरशिवाय थेट सिग्नल्सचे विश्लेषण करण्यासाठी प्रगत रेडिओ तंत्रज्ञान आणि पॉवरफुल कॉम्प्युटिंगचा वापर करते. सिग्नल्स अस्सल आहेत की त्यात छेडछाड करण्यात आली आहे, हे हे डिव्हाइस त्वरित ओळखून चेतावणी देते. संशोधकांनी या यंत्रणेची तुलना कार्बन मोनॉक्साइड अलार्मशी केली आहे, जो धोका वाढण्यापूर्वीच लोकांना सतर्क करतो.

सर्वसामान्यांना आणि वाहतूक क्षेत्राला होणारा फायदा
सध्या इंटरनेटवर बंदी असलेले जीपीएस जॅमर्स आणि स्पूफिंग साधने सहज उपलब्ध होत असल्याने लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. हे नवीन डिटेक्टर स्वस्त आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. जर प्रवासादरम्यान वाहनचालक किंवा कंपनीला आपले लोकेशन चुकीचे दिसत असल्याचे या अलार्ममुळे त्वरित समजले, तर पुढील अनर्थ वेळेत टाळता येईल. भविष्यात डिजिटल दळणवळण अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा – MLFF Toll System : टोल नाक्यांवरील रांगा आता इतिहासजमा! 'MLFF' प्रणालीने 2027 पर्यंत महामार्ग होणार टोल नाकामुक्त

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number